SEND OFF : प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा

SEND OFF : प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा

विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शाळा, शिक्षकांविषयी कृतज्ञता

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सेलू येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सविता रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसागर,  नारायण चौरे यांची या वेळी उपस्थिती होती.

स्वतःमधील कमतरता शोधण्यात अधिक वेळ न घालवता, स्वतःमधील क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतल्यास कोणीही यशापासून दूर ठेवू शकत नाही, असे प्रतिपादन डॉ.संजय रोडगे यांनी या वेळी केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये, असे डॉ.सविता रोडगे म्हणाल्या. या कार्यक्रमाचे संयोजन नववी वर्गातील विद्यार्थ्यांनी केले. या निमित्ताने फिश पॉंड, विविध गेम, संगीत खुर्ची व अल्पोपहाराचे आयोजन केले होते. समृद्धी काकडे व वेदश्री चट्टे या विद्यार्थिनीने डॉ संजय रोडगे, तसेच सर्व शिक्षकांचे आभार मानले. आम्ही या शाळेला कधीच विसरू शकणार नाही, असे समृद्धी म्हणाली. अर्पिता हिवरे, शिवम शिंदेल यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड शुभेच्छा संदेश देण्यात आला.प्रास्ताविक कार्तिक रत्नाला यांनी केले. सूत्रसंचालन अन्वेषा, तर आभार रीना ठाकूर यांनी मानले.


अनावरण : स.गो.नखाते यांचा पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : विरोधी पक्ष नेते अजित पवार

घणाघात : सरकाराच्या नाकर्तेपणामुळे राज्याचे मोठे नुकसान; शिंदे-फडणवीस सरकारवर अजितदादा कडाडले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!