अनावरण : स.गो.नखाते यांचा पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : विरोधी पक्ष नेते अजित पवार
पाथरीतील कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा नामविस्तार, अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, मान्यवरांची उपस्थिती
सेलू / पाथरी : राजकीय वारसा नसतांना तल्लख बुध्दीमत्तेच्या जोरावर वकिली व्यवसायात लोकप्रियता मिळवून चार वेळा आमदार व राज्यमंत्री असा आदर्शवत राजकीय प्रवास असलेले कै.स.गो.नखाते यांचा देवनांद्रा शाळेच्या परिसरात उभारण्यात आलेला अर्धाकृती पुतळा हा नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी देवनांद्रा शाळेच्या परिसरात कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा असा नामविस्तार व कै.स.गो.नखाते यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण रिमोटकंट्रोलच्या साहाय्याने अजित पवार यांचे हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्राणी होते. नवनिर्वाचित शिक्षक आमदार विक्रम काळे , आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजयराव भांबळे, माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी जिल्हा परिषद .अध्यक्ष राजेश विटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माजी आमदार डॉ.मधुसुदन केंद्रे, रविंद्र तौर, किरण सोनटक्के, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, विनायक पावडे, दादासाहेब टेंगसे, कपिल आकात, लक्ष्मीकांत देशमुख, विजयकुमार कत्रुवार, डॉ. व्दारकादास लड्डा, बालकिशन चांडक, संयोजक अनिलराव नखाते, भावनाताई नखाते, आदित्य नखाते, अजिंक्य नखाते, मुख्याध्यापक बी.आर.होगे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी संयोजक अनिलराव नखाते, भावनाताई नखाते यांनी अजित पवार यांचा शाल, चांदीचा रथ व सर्व मान्यवराना शाल, साईबाबा मूर्ती देऊन सन्मान केला. नवनिर्वाचित शिक्षक विक्रम काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, स.गो.नखाते यांनी राजकीय नेतृत्वाच्या समन्वयातून कुशल संघटन व सचोटीने दिर्घकाळ या भागाचे आमदार व राज्यमंत्री म्हणून नेतृत्व केले. त्यांचा या भागाच्या विकासाबरोबर कृषी, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात मोलाचा सहभाग आहे. नखाते यांनी कौटुंबिक व्यवस्थापनात उत्तमपणे लक्ष केंद्रीत केले. परिणामी त्यांच्या चिरंजीवांनी वैद्यकीय, कृषी, उद्योगक्षेत्रात भरारी घेतली, तर अनिलराव नखाते यांनी वाल्मिकी शिक्षण संस्था, वाल्मिकी बँक, बाजार समिती व्यवस्थापन, तर भावनाताई नखाते यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षकार्य व जिल्हा परिषद प्रशासनांचा आदर्शवत कार्य केले आहे. या वेळी आमदार सुरेशराव वरपुडकर, भावनाताई नखाते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव बालकिशन चांडक यांनी केले तर सुत्रसंचालन अर्चना घटे, अनुरथ काळे, तुकाराम शेळके यांनी केले. मुख्याध्यापक बी.आर.होगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरीक, महिला मोठ्या संख्येन उपस्थिती होत्या. या निमित्ताने नरेंद्र राठोड प्रस्तुत सप्तसुर या आर्केस्ट्रातील बहारदार संगीत मैफीलीस श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी संयोजक अनिलराव नखाते, भावनाताई नखाते यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा शाल, चांदीचा रथ व सर्व मान्यवराना शाल, साईबाबा मूर्ती देऊन सन्मान केला. नवनिर्वाचित शिक्षक विक्रम काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान रेवणअप्पा साळेगावकर यांनी ‘कै.स.गो.नखाते यांचा नेतृत्व आणि कार्यकृर्तत्वाचा झंझावात ‘या लघुपटाची प्रस्तावना केली. लघुपटातून कै.स.गो.नखाते यांचे कौटुंबिक व राजकीय असा आदर्शवत प्रवासाचा उलगडा श्रोत्यांनी अनुभवला. या लघुपटातून स.गो.नखाते यांच्या कार्याला उजाळा मिळाला.
या प्रसंगी संयोजक अनिलराव नखाते, भावनाताई नखाते यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा शाल, चांदीचा रथ व सर्व मान्यवराना शाल, साईबाबा मूर्ती देऊन सन्मान केला. नवनिर्वाचित शिक्षक विक्रम काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान रेवणअप्पा साळेगावकर यांनी ‘कै.स.गो.नखाते यांचा नेतृत्व आणि कार्यकृर्तत्वाचा झंझावात ‘या लघुपटाची प्रस्तावना केली. लघुपटातून कै.स.गो.नखाते यांचे कौटुंबिक व राजकीय असा आदर्शवत प्रवासाचा उलगडा श्रोत्यांनी अनुभवला. या लघुपटातून स.गो.नखाते यांच्या कार्याला उजाळा मिळाला.
‘कै.स.गो.नखाते यांचा नेतृत्व आणि कार्यकृर्तत्वाचा झंझावात ‘ लघुपट
घणाघात : सरकाराच्या नाकर्तेपणामुळे राज्याचे मोठे नुकसान; शिंदे-फडणवीस सरकारवर अजितदादा कडाडले
SEND OFF : प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा