Politics : फडणवीसांनी खरं बोलायला शिकावं : खासदार सुप्रिया सुळे

Politics : फडणवीसांनी खरं बोलायला शिकावं : खासदार सुप्रिया सुळे

परभणीत खासदार सुळे यांचा फडणवीसांना सल्ला; केंद्र, राज्य सरकारावर टीका

परभणी : केंद्र सरकारमधील एकमेव मंत्री काम करतात, ते म्हणजे नितीन गडकरी; बाकीचे साफ खोटे बोलत आहेत, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजकारण थोडं बाजूला ठेवून खरं बोलायला शिकावं. जनतेची सेवा करावी.
परभणी येथे मंगळवारी (१४ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय गव्हाणे, विजय भांबळे, मधुसुदन केंद्रे, राजेश विटेकर, किरण सोनटक्के, प्रताप देशमुख अजय चौधरी, संतोष देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे आदींची उपस्थिती होती.

खासदार सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसने साठ वर्षांत काय केले? असे विचारणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तरी नऊ वर्षांत काय केले ? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक योजनांच्या केवळ घोषणा करण्यात आल्या असून, निधीची तरतूदच नाही. शिक्षण, शेती, आरोग्य या विषयावर अपेक्षित निधी दिलेला नाही. देशात बेरोजगारी व महागाईने उच्चांक गाठला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असून, तो दुर्दैवी आहे, असा आरोप सुळे यांनी केला.
राज्यात गुन्हेगारी वाढत असून, पत्रकाराचा खून होतो. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरू आहे. त्याकडे गृहमंत्री फडणवीस यांनी लक्ष द्यावे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत, असे सुळे यांनी नमूद केले. नवीन राज्यपालांसोबत आपण दहा वर्षे काम केलेले असून, ते राज्यात निःपक्षपातीपणे काम करतील अशी अपेक्षा आहे, असे सुळे म्हणाल्या.

केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक योजनांच्या केवळ घोषणा करण्यात आल्या असून, निधीची तरतूदच नाही. शिक्षण, शेती, आरोग्य या विषयावर अपेक्षित निधी दिलेला नाही. देशात बेरोजगारी व महागाईने उच्चांक गाठला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असून, तो दुर्दैवी आहे, असा आरोप खासदार सुुप्रिया सुळे यांनी या वेळी केला.

Politics : फडणवीसांनी खरं बोलायला शिकावं : खासदार सुप्रिया सुळे

परभणी रेल्वेस्थानकावर खासदार सुप्रिया सुळे यांचे माजी आमदार विजय भांबळे यांनी स्वागत केले.

गुणवंतांचा गौरव : सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!