Global Pride Award : सेलूतील क्युरिअस किड्स प्रीस्कूलला ग्लोबल प्राईड; डॉ.संजय रोडगे यांचा दिल्लीत सन्मान

Global Pride Award : सेलूतील क्युरिअस किड्स प्रीस्कूलला ग्लोबल प्राईड; डॉ.संजय रोडगे यांचा दिल्लीत सन्मान

श्रीराम प्रतिष्ठानच्या विविध घटक संस्थांच्यावतीने डॉ.संजय रोडगेंचा सत्कार करण्यात आला

सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील सॅनरो एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत क्युरिअस किड्स प्रीस्कूलला ग्लोबल प्राईड अवार्डने सोमवारी (१३ फेब्रुवारी) रोजी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. क्युरिअस स्कूलचे चेअरमन डॉ.संजय रोडगे यांनी पुरस्कार स्वीकारला. भारतीय जागतिक व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेत जी.टी.टी.सी.आयचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गौरव गुप्ता यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या स्कूलमध्ये फिनलॅंडच्या शिक्षण पद्धतीवर आधारित कृतियुक्त, विद्यार्थी केंद्रित, सहज व आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या स्कूलचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासाशी संबंधित पाच कॉर्नरवर भर दिला जातो. रोल प्ले अॅक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांना मूळ संकल्पना  सहज स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो, असे डॉ.संजय रोडगे यांनी सांगितले.पुरस्काराबद्दल डॉ.संजय रोडगे यांचा श्रीराम प्रतिष्ठानच्या विविध घटक संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या स्कूलमध्ये फिनलॅंडच्या शिक्षण पद्धतीवर आधारित कृतियुक्त, विद्यार्थी केंद्रित, सहज व आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या स्कूलचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासाशी संबंधित पाच कॉर्नरवर भर दिला जातो. रोल प्ले अॅक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांना मूळ संकल्पना  सहज स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो, असे डॉ.संजय रोडगे यांनी सांगितले.


Politics : फडणवीसांनी खरं बोलायला शिकावं : खासदार सुप्रिया सुळे

गुणवंतांचा गौरव : सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!