महाशिवरात्री उत्सव : बारा ज्योतिर्लिंग दर्शन,चैतन्य देवी झॉंकी; सेलूतील साई मंदिरात आज उद्घाटन
चार दिवस भाविकांसाठी दर्शन, चैतन्य देवी झाँकी, प्रदर्शन खुले, मान्यवरांची उपस्थिती
सेलू : महाशिवरात्री अर्थात शिव परमात्माचा दिव्य जन्मोत्सव, या दिव्य पर्वानिमित्त येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने गुरुवार ते रविवार ( १६ ते १९ फेब्रुवारी) बारा ज्योतिर्लिंग दर्शन, चैतन्य देवी झॉंकी व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. महेशनगरातील साईबाबा मंदिरात गुरुवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
बारा ज्योतिर्लिंग दर्शन, प्रदर्शनी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत व सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत, तर चैतन्य झॉंकी व प्रदर्शनी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी खुले राहणार आहे. या उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, दर्शन प्रदर्शनी व चैतन्य देवी झॉंकी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेलू येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका बी.के.सविता बहेन व ब्रह्माकुमारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
पाच दिवसीय शिबिरांचे आयोजन
‘यदा यदा ही धर्मस्य ग्लार्निभवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।” गीतेतील या वचनानूसार परमात्मा स्वतः सृष्टीवर अवतरीत होऊन ब्रह्मा तनाव्दारे नवयुगाची आदि सनातन देवी-देवता धर्माची सध्या गुप्तरितीने स्थापना करीत आहेत. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय ही एक अध्यात्मिक शिक्षण देणारी, सुखशांतीचा महामंत्र देणारी संस्था आहे. या विद्यालयाद्वारा शिकविल्या जाणार्या सहज राजयोगाचा अनेकांनी लाभ घेऊन आपल्या जीवनात मनाची शांती, एकाग्रता, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती आदी अनेक सकारात्मक बाबींची प्राप्ती केली आहे. अनेक रोगांपासूनही मुक्ततेचा अनुभव करत आहेत. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या संस्थेतर्फे दैनंदिन जीवनातील समस्या,कौटुंबिक कलह, तणाव, मतभेद या सर्वांवर मात कशी करता येईल या विषयी पाच दिवसीय शिबीराचे आयोजन केले जाते.शिबिरात प्रवेश विनामूल्य आहे. उपस्थित राहून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरात जाणून घेऊया…
आपण कोण आहोत ? कुठून आलो आहोत ?, शिव, शंकर एक आहेत का वेगळे? शिवरात्रीचे रहस्य काय?, गितेतील सहज राजयोग कसा करावा?, दिवाळी, दसरा, नवरात्रींचे अध्यात्मिक रहस्य काय ?, परमात्मा कोण आहेत? कुठे आहे?, शिवावर बेलाचे पान, धोत याचे फुल का अर्पण करतात ?, मनुष्यात्म्याच्या ८४ जन्मांची कहाणी काय आहे?, जीवनातले अशी अनेक गुह्य रहस्य जाणून परमात्म अनुभूती करा.
शिबिर कालावधी : 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023, वेळ : सायंकाळी सहा ते साडेसात, स्थळ : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा शिवदीप भवन,यशवंतनगर, सेलू जि.परभणी, मो.नं. ८६२३०३२१६४, शिबिरात सहभागी होण्यासाठी 8623032164 या मोबाईल नंबरवर व्हॉट्ॲप रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
गुरुवार ते रविवार ( १६ ते १९ फेब्रुवारी) या कालावधीत बारा ज्योतिर्लिंग दर्शन, प्रदर्शनी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत व सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत, तर चैतन्य झॉंकी व प्रदर्शनी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी खुले राहणार आहे. या उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, दर्शन प्रदर्शनी व चैतन्य देवी झॉंकी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेलू येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका बी.के.सविता बहेन व ब्रह्माकुमारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.