भाविकांची गर्दी : महाशिवरात्री उत्सवाचे सेलूत उद्घाटन; बारा ज्योतिर्लिंग, चैतन्य देवींची झॉंंकी पाहण्यासाठी गर्दी

भाविकांची गर्दी : महाशिवरात्री उत्सवाचे सेलूत उद्घाटन; बारा ज्योतिर्लिंग, चैतन्य देवींची झॉंंकी पाहण्यासाठी गर्दी

ब्रह्माकुमारी विद्यालयाचे आयोजन, साई मंदिरात चार दिवस चालणार उत्सव, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

 

सेलू (जि.परभणी) : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने आयोजित चार दिवसीय महाशिवरात्री उत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते गुरुवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी झाले. महेशनगरातील साईबाबा मंदिरात गुरुवारी सायंकाळी उत्सवाला सुरुवात झाली. रविवारपर्यंत (१९ फेब्रुवारी) हा उत्सव चालणार आहे. या वेळी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, डॉ.अरुण रोडगे, उर्मिला बोराडे, विजया बोराडे, बी.एस.कोलते, नयन बोराडे, बीके सविता बहेन आदींची प्रमुख उपस्थिती

उत्सवानिमित्त बारा ज्योतिर्लिंग दर्शन, आदीशक्ती चैतन्य देवींची विविध रुपे दर्शविणारा सजीव देखावा (झॉंकी) साकारण्यात आला आहे. ब्रह्माकुमारी विद्यालयाची माहिती देणारी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. दररोज सकाळी आठ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी बारा ज्योतिर्लिंग दर्शन, सजीव देखावा व प्रदर्शनी रविवारपर्यंत खुली राहणार आहे. भाविकांनी दर्शन व प्रदर्शनीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन सेलू येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका बी.के.सविता बहेन व ब्रह्माकुमारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

बारा ज्योतिर्लिंग दर्शन, आदीशक्ती चैतन्य देवींची विविध रुपे दर्शविणारा सजीव देखावा (झॉंकी) साकारण्यात आला आहे. ब्रह्माकुमारी विद्यालयाची माहिती देणारी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. दररोज सकाळी आठ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी बारा ज्योतिर्लिंग दर्शन, सजीव देखावा व प्रदर्शनी रविवारपर्यंत खुली राहणार आहे. गुरूवारी सायंकाळी बारा ज्योतिर्लिंग दर्शन, देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

महाशिवरात्री उत्सव :

सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!