सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
विविध स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक, मान्यवरांची उपस्थिती
परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन बुधवारी (१५ फेब्रुवारी) उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ.अंकित मंत्री यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी.के.देशपांडे , चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, मकरंद दिग्रसकर, दत्तरावजी पावडे, रोहिणी महाजन, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे यांची उपस्थिती होती. या वेळी विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सुखानंद बेंडसुरे, अहवाल अनिल रत्नपारखी यांनी सादर केला. सूत्रसंचालन व आभार बालसभेच्या सान्वी शितळे, भावेश सोळंके या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उल्हास पांडे, एकनाथ जाधव, नरेंद्र झाल्टे, एस.आर.डाफणे, रमेश काळे, आर.एन.डोळस, एस.बी.भुमरे, आर.डी.कुंभार, ए.आर.पंडित, बापूसाहेब पानझाडे, प्रल्हाद पवार व शिक्षकांनी परिश्रम घेतले.