सेलूतील जिजामाता बाल विद्या मंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात
जय जय महाराष्ट्र माझा या गीताने समारोप, विद्यार्थ्यांचे कौतुक
सेलू : आंबेडकरनगर येथील जिजामाता बाल विद्या मंदिर येथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदी राजर्षि छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड, तर प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक सुरेशजी काबरा, संस्था सचिव डी.व्ही. मुळे, बाबासाहेब चारठाणकर, डॉ.गोविंद डख, बुरे माऊली, मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांची उपस्थिती होती.
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी सादर केला. यानंतर डी.व्ही.मुळे यांनी संस्थेच्या वाटचाली बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात सर्व स्नेहसंमेलन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले.कै.पंडितकाका देशपांडे (चारठाणकर) स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार इयत्ता चौथी व सातवीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रमुख अतिथी सुरेशजी काबरा यांनी विद्यार्थ्यांना बुलढाणा बँकेत येऊन भेट देण्याचे निमंत्रण दिले तसेच पुढील वर्षी पासून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक जाहीर केले.समारोप डॉ.अनिकेत जोगदंड यांनी अध्यक्षीय समारोपात विदयार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घ्या व सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या असे प्रतिपादन केले. या प्रसंगी आंबेडकरनगर व परिसरातील पालक मोठया प्रमाणात हजर राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.
कार्यक्रम सूत्रसंचालन मंगेश शेळके यांनी केले, तर आभार भगवान पावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयमाला काळे, खापरखुंटीकर कृष्णकांत, विष्णू कटारे, सुनील राठोड, बाळू धनवे, शेख सादेखा मॅडम, तुकाराम अंभुरे यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यानिमित्ताने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रमुख अतिथी सुरेशजी काबरा यांनी विद्यार्थ्यांना बुलढाणा बँकेत येऊन भेट देण्याचे निमंत्रण दिले, तसेच पुढील वर्षी पासून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक जाहीर केले.समारोप डॉ.अनिकेत जोगदंड यांनी अध्यक्षीय समारोपात विदयार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घ्या व सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या असे प्रतिपादन केले.
महाशिवरात्री उत्सव : चैतन्य देवींच्या देखाव्याला सेलूकरांचा मोठा प्रतिसाद, ब्रह्माकुमारींचा उपक्रम
स्नेहसंमेलन : ‘नूतन’च्या चिमुकल्यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम