स्नेहसंमेलन : ‘नूतन’च्या चिमुकल्यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम
मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण
सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन पूर्वप्राथमिक विभागात वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त क्रीडा स्पर्धा व माता पालक स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने चिमुकल्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यकक्रमात सामूहीक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. रुपाली सुदर्शन मालाणी यांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, मकरंद दिग्रसकर, दत्तरावजी पावडे, डॉ. सुदर्शन मालाणी, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी, श्रीमती सी.आर.बोबडे यांची उपस्थिती होती.
बालवाडीतील विद्यार्थी, विजेता माता पालक यांचे प्रमाणपत्र. भेटवस्तू व बक्षिस देऊन कौतूक व अभिनंदन करण्यात आले. प्रास्ताविक श्रीमती सी.आर.बोबडे अहवाल ए.जी पवार, आभार एस.एम.कुलकर्णी. सूत्रसंचालन एम.डी.बायस ठाकूर यांनी केले. प्रमुख पाहुण्या डॉ रुपाली मालाणी यांनी DRIVER या शब्दाचा आधार घेऊन पालकांनी आपल्या पाल्याविषयी अधिक जागृत राहण्याबाबत सांगितले. बालकांचे संगोपन करतांना शिस्त, आदर, बुद्धिमान दृष्टी, कार्यक्षम व कुशल जबाबदारी या गुणांची शिकवण देणे आवश्यक आहे. बालकाचे आरोग्य, बालकाचे शिक्षण व बालकाचा आहार याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. एस. बी. देवकर सौ. ए. एन. पवार, सौ. एम. ई. होलिया, सौ. सौ. आर. आर. जी. ताठे, सौ. बी. आर. भांडवले व्ही, गाल एक पी. बी. पवार बालवाडी ताई व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
प्रमुख पाहुण्या डॉ.रुपाली मालाणी यांनी DRIVER या शब्दाचा आधार घेऊन पालकांनी आपल्या पाल्याविषयी अधिक जागृत राहण्याबाबत सांगितले. बालकांचे संगोपन करतांना शिस्त, आदर, बुद्धिमान दृष्टी, कार्यक्षम व कुशल जबाबदारी या गुणांची शिकवण देणे आवश्यक आहे. बालकाचे आरोग्य, बालकाचे शिक्षण व बालकाचा आहार याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.
महाशिवरात्री उत्सव : चैतन्य देवींच्या देखाव्याला सेलूकरांचा मोठा प्रतिसाद, ब्रह्माकुमारींचा उपक्रम