प्रा.अमित कुलकर्णी यांना पीएच्.डी

प्रा.अमित कुलकर्णी यांना पीएच्.डी 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे सुक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएचडी

सेलू : येथील नूतन महाविद्यालयातील प्राध्यापक अमित दिलीपराव कुलकर्णी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे सुक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय “डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोफॉस टेक्नॉलॉजी बाय युझींग अल्कॅलीफीलीक ॲक्टीनोमायसेट्स ॲझ इफीशिएंट बायोइनॉक्युलंट” हा आहे.

ज्ञानोपासक महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.प्रशांत वक्ते यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. प्रा. कुलकर्णी यांनी शोधप्रबंधात सादर केलेली मायक्रोफॉस टेक्नॉलॉजी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे अनुमान परीक्षकांनी वर्तवले. मायक्रोफॉस टेक्नॉलॉजी या विषयावर प्रा.कुलकर्णी यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत यंग सायंटिस्ट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले होते. नुकतेच त्यांचे या संदर्भात पेटंट प्रकाशित झाले आहे. या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ. व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजश बिहाणी, प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ.उत्तम राठोड, डॉ.निर्मला पद्द्मावत, विभागप्रमुख डॉ.प्रकाश कंठाळे, कार्यालयीन अधिक्षीका उषा कदम, पर्यवेक्षक नागेश कान्हेकर, समन्वयक दयानंद जामगे, शीतल चव्हाण, विष्णू काकडे आदींसह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!