OPS STRIKE : सेलूतील ठिय्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद; आठशेवर कर्मचारी संपात

OPS STRIKE : सेलूतील ठिय्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद; आठशेवर कर्मचारी संपात

सेलूतील तहसील कार्यालय परिसरात आंदोलन, जुन्या पेन्शनसाठी विविध संघटना आग्रही, कार्यालये पडली ओस

सेलू जि.परभणी : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील कार्यालये ओस पडली आहेत.‌ दरम्यान, सेलू (जि.परभणी) येथील तहसील कार्यालय परिसरातील ठिय्या आंदोलनाला बुधवारी (१५ मार्च) मोठा प्रतिसाद मिळाला.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांबाबत हा संप पुकारण्यात आला आहे. सेलू येथील तहसील कार्यालय परिसरात वीसहून अधिक कर्मचारी संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू आहे. संपात विविध विभागाचे आठशेवर कर्मचारी सहभागी झाल्याचे जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी तानाजी भोसले यांनी सांगितले. नितीन खाकरे, आत्माराम हारकळ, गजानन शितळे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन अध्यक्ष मनोज रोडगे, जीवन खरावणे, अनंत भुक्तर, मकरंद पिंपळगावकर, सुनिता अंभोरे, शिल्पा देशपांडे, गोविंद चांदजकर आंदींची या वेळी उपस्थिती होती.

संपात सहभागी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरातील ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद आष्टीकर, महसूल संघटना तालुकाध्यक्ष अनंत शहाणे,
ग्रामसेवक संघटनेचे आर.एस.वाव्हळे, कृषी सहायक संघटनेचे संदीप शेळके, नगर परिषद कर्मचारी संघटनचे मल्लिकार्जुन स्वामी, नितीन इजाते, रामराव पवार, रंगनाथ तांबे, सोमेश्वर प्रधान, शेख मोईन, रंगरेज, संजय साळवे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे रमेश कायंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अमोल निकम, प्राथमिक शिक्षक परिषदेचे राजू द्यावरवार, विकास मुपडे, सूर्यनारायण रासवे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद नानासाहेब पवार, माधव गव्हाणे, रामराव गायकवाड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सुनील रणखांब, आरोग्य कर्मचारी संघटनेचे उद्धव हिवरे, जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे रघुनाथ देशमुख आदींसह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे रामकृष्ण शेरे यांनी बुधवारी आंदोलनात सहभाग घेत संपाला पाठिंबा दर्शविला आहे. या वेळी मिलिंद सावंत, सचिन कोरडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, संपामुळे तहसील कार्यालय ओस पडले आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार वगळता एकूण ५२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिली. नगर परिषद, भूमी अभिलेख, पंचायत समितीचे बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे. ही कार्यालये ओस पडल्याचे चित्र आहे.

काळ्या फिती लावून परीक्षा कार्य

शहरातील काही मोठ्या खासगी शाळेतील निम्म्याहून अधिक शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पर्यवेक्षण कार्यात सहभागी करून घेतले, तर काही परीक्षा केंद्रावर संपकरी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून परीक्षा कार्य सुरू ठेवले आहे. दरम्यान, सेलू शहरातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता, बुधवारी काळ्याफिती लावून निषेध नोंदवत पाठिंबा दर्शवला. प्राचार्य एम.एम.कसबे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, लिपीक दिनकर नखाते, प्रा.भाऊसाहेब निकम, प्रा.संतोष कुलकर्णी, प्रा.सावंत, संजय चांगले, गंगाधर तोंदूलवार, जे.जी.गिरी, शेषराव नागरे, रामेश्वर गाडेकर, रामेश्वर कदम, रोंटेवाड , सोळंके, विष्णू सरकटे, सुनील मोरे, अजिंक्य बोराडे व नारायण काष्टे यांची या वेळी उपस्थिती होती.

sakashnews.com

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे रामकृष्ण शेरे यांनी बुधवारी आंदोलनात सहभाग घेत संपाला पाठिंबा दर्शविला आहे. या वेळी मिलिंद सावंत, सचिन कोरडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, संपामुळे तहसील कार्यालय ओस पडले आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार वगळता एकूण ५२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिली. नगर परिषद, भूमी अभिलेख, पंचायत समितीचेही बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे. ही कार्यालयेदेखील ओस पडल्याचे चित्र आहे.

sakashnews.com

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!