खासदार जाधवांना ‘वाय’ सुरक्षा द्या; शिवसेना ठाकरे गटाचे प्रशासनाला निवेदन

खासदार जाधवांना ‘वाय’ सुरक्षा द्या; शिवसेना ठाकरे गटाचे प्रशासनाला निवेदन

अज्ञात आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी

सेलू जि.परभणी : शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने खासदार जाधव यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा द्यावी, अज्ञात आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

परभणीत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.पंढरीनाथ धोंडगे, गंगाप्रसाद आनेराव, माणिकराव आव्हाड, तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले आदींनी यासंदर्भात पोलिस प्रशासनामार्फत निवेदन सादर केले आहे. गंगाखेड येथे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या, तर सेलू येथेही मंगळवारी ( २८ मार्च) सेलू-जिंतूर विधानसभा प्रमुख रामनाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी रणजीत गजमल, सुधाकर पवार, गुलाब खेडेकर, मनीष कदम, मंगल कथले, तालुकाप्रमुख रमेश डख, युवासेना शहरप्रमुख वैभव वैद्य, विठ्ठल महाराज कारके, दलित आघाडीचे गौतम कनकुटे, रामेश्वर बहिरट, गोपाळराव कदम, दत्तराव झोल, अंकुश लोंढे, आप्पाराव गायकवाड, विनोद पाटील, श्याम मुंडे, अरुण ताठे, जीवन चव्हाण, नाथा खांडेकर, विष्णू नाईकनवरे, उद्धव काष्टे, स्वप्निल मगर, बाबा भाबट, रामा डाके, ओम वावरे, डिगांबर बरडे, अक्षय डिग्रसकर, गणेश गेटे, अनुराग अंबटी, अमोल बाबर, रमेश वाघ, सुरेश चव्हाण, संतोष तरवडगे, रमेश खनपटे, गणेश तुरे, सुनील रनदिवे आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!