श्रीकालिकादेवी यात्रोत्सवाला भाविकांची गर्दी, विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
हेलस येथे कीर्तन, प्रवचन, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद
परभणी : हेलस (ता.मंठा) येथील श्री कालिकादेवी संस्थानच्या वतीने तीन दिवस आयोजित श्री कालिकादेवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला चैत्र शुद्ध व्दितीया ते चतुर्थी या कालावधीत पंचक्रोशातील, तसेच राज्याच्या कानाकोपाऱ्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हेलस येथे कासार समाजाच्या कुलदेवतेचे प्राचीन ठाणे आहे. उत्सवात दररोज सकाळी देवीला अभिषेक, चढाव व महापूजा झाली. सायंकाळी छबिना उत्सव झाला. पंडित अशोककुमार वानरे, सनतकुमार वानरे, सतीश कंधारकर मीनाक्षी कंधारकर, जयश्री वानरे, दिलीप वानरे यांच्या मार्गदर्शनात महापूजा सोहळा झाला.
माणिक महाराज मांगुळकर, रामेश्वर महाराज नालेगावकर यांचे कीर्तन, तर देविदास महाराज ढोके, अशोक वानरे, तुळशीराम महाराज खराबे यांचे प्रवचन झाले. सेलू (जि.परभणी) तालुक्यातील श्री जगदंबा मंदिर संस्थानच्या ७० बाल वारकऱ्यांनी सादर केलेल्या संगीत हरिपाठ, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. डॉ.शिवाजी पोकळे, संध्या भांडेकर, संध्या पोकळे, बबनतात्या हेलसकर आदींची उपस्थिती होती. महाप्रसाद व आरतीने उत्सवाची सांगता झाली. समाज बांधवांनी शुद्ध पाण्याचे जारच्या माध्यामातून जलसेवा दिली.यशस्वीतेसाठी अध्यक्ष सतीश तळणीकर, बालासाहेब दहिभाते, सुभाषराव दहिभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर, वर्धमान कासार, अशोक हेलसकर, गजानन कुंभकर्ण, भरत दहिभाते, गजानन हेलसकर, पंढरीनाथ हेलसकर, विजय दहिभाते, ज्ञानेश्वर हेलसकर, सूरज दहिभाते, गजानन ढोले, प्रमोद दहिभाते, कालिदास दहिभाते, कृष्णा दहिभाते, संदीप दहिभाते, महेश ढोके, गोविंद पानपट, बाबा शिनगारे, अनिल कुंभकर्ण आदींसह महिला, नवयुवक मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
आराधना सेवा सन्मान
महोत्सवात ३३ समाज बांधवांना सपत्नीक आराधना सेवा सन्मानाने गौरविण्यात आले. गोपाळ दहिभाते, रामप्रसाद, वराडे, शंकरराव हेलसकर, सुभाषराव कुंभकर्ण, वसंतराव विश्वांभरे, भास्करराव शिलवंत, अशोक हलगे, आबासाहेब पानपट, किरणचंद विभुते, सुभाष रांजणकर, प्रकाश चिलवंत, गणेश आहेर, सुभाषराव शिलवंत, विशाल अक्कर, प्रकाश विभुते, स्वप्नील वानरे, प्रा.सूर्यकांत शेंडे, रामकृष्ण खोमाडे, गजानन खराबे, दत्तराव खराबे आदींचा यामध्ये समावेश आहे.