प्रवचनमालेला सेलूत आजपासून सुरुवात
वसंत प्रतिष्ठानचा उपक्रम : चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाणीतून पसायदानावर चिंतन
परभणी : सेलू येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवारपासून ( सहा एप्रिल) तीन दिवस चैतन्य महाराज देगलूरकर यांची ‘पसायदान’ प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे.
प्रवचनमालेचे हे चौथे वर्ष आहे. सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा मंदिर सभामंडपात शनिवारपर्यंत ( ८ एप्रिल ) दररोज सायंकाळी सहा वाजता प्रवचननहोणार आहे. श्रोत्यांनी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्याोजक महेश खारकर, विधीज्ञ उमेश खारकर, खारकर परिवार आणि संयोजकांनी केले आहे.