‘अल्कोहोलिक्स अनॉनिमस’ची रविवारी जनजागरण सभा; समस्याग्रस्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

‘अल्कोहोलिक्स अनॉनिमस’ची रविवारी जनजागरण सभा; समस्याग्रस्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

दारूमुक्तीसाठी १८३ देशांमध्ये मोफत काम करणारी संस्था, परभणी शाखेच्या वतीने आयोजन, समस्याग्रस्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

परभणी : दारूचे व्यसन असणाऱ्या लोकांना व्यसनमुक्त करण्याचे काम करणाऱ्या ‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या परभणी शाखेच्या वतीने येत्या रविवारी (९ एप्रिल ) मोफत जनजागरण सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे गुरूवारी दिली आहे. 
परभणी शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला, स्टेशन रोड येथे सकाळी १०.३० ते १२ या दरम्यान सभा होणार आहे. दिवसेंदिवस मद्यपींचे प्रमाण वाढत आहे. दारूच्या आहारी गेलेल्यांना या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी १९३५ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. दारूमुक्तीसाठी ही संस्था १८३ देशांमध्ये मोफत काम करीत आहे. दारूच्या आहारी गेलेल्यांना परावृत्त करून त्यांच्या माध्यमातून इतरांना दारू पिण्यापासून थांबविणे, या तत्त्वांवर ही संस्था काम करते. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गावांमध्ये संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून लाखो मद्यपी व्यसनमुक्त झाले आहेत. मद्यपी व्यक्तींच्या पत्नींसाठीही ही संस्था समुपदेशन करते. दारूमुक्तीसाठी १२ पायर्‍या सूचविण्यात आल्या आहेत. याचे आचरण केल्यास एकेक दिवसाच्या हिशोबाने दारूपासून दूर राहाता येते व जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणता येतात. या संस्थेच्या चळवळीत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, अशी माहिती आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

दारू ही तुमची किंवा तुमच्या कुटुंबियांची, परिचयातील व्यक्ती, मित्रांची समस्या  झाली असेल, तर जनजागरण सभेला अवश्य हजर रहावे. या सभेत अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या (ए.ए) माहिती पुस्तिकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. मोफत माहिती व मदतीसाठी ९४२१४६१७२७ किंवा ९४२३१४२९९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  आयोजकांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!