प्राचार्य डॉ.बी.टी.भोसकर यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
सेलूतील विविधांगी व्यक्तीमत्त्व पडद्याआड, विविध क्षेत्रातून आदरांजली
परभणी : सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन महाविद्यालयाचे निवृत प्राचार्य डॉ.बी.टी.भोसकर (वय ७९) यांचे रविवारी (९ एप्रिल) पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा; तीन मुले निखिल, मन्मथ व अभिजित, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
भौतिकशास्त्र हा डॉ.भोसकर यांचा अध्यापनाचा विषय होता. सोबतच विविधांगी वाचनाचा दांडगा व्यासंगही त्यांनी जोपासला. विविध विद्यार्थी पूरक उपक्रम, राज्य, राष्ट्रीय परिषद, अधिवेशनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. संस्थेच्या श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे संयोजक म्हणून बराच काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली. डॉ.भोसकर यांच्यासारखे सेलूतील विविधांगी व्यक्तीमत्त्व पडद्याआड गेल्याची वार्ता समजताच सोशल माध्यमांवर विविध क्षेत्रातून मान्यवर , नागरिकांनी आदरांजली वाहून सहसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, वार्धक्यवाधींनीग्रस्त शरीरामुळे संकल्पानुसार मृत्यूपश्चात डॉ.भोसकर यांचे देहदान शक्य झाले नाही, असी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
विनातक्रार जीवनाचा आनंद घ्या : चैतन्य महाराज देगलूरकर; प्रवचनमाला उत्साहात