सेलू बाजार समिती : डॉ.संजय रोडगेंच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात; मतदारांच्या गाठीभेटी
कुंडी, गुगळी धामणगाव, तिडीपिंपळगाव येथे मतदारांशी साधला संवाद
सेलू : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वातील तुळजाभवानी पॅनलचे सभापतीपदाचे अधिकृत उमेदवार संजय रोडगे यांच्या प्रचाराला बुधवारी ( १२ एप्रिल) धुमधडाक्यात सुरुवात झाली.
कुंडी येथील मल्लिकार्जुन महादेव, गुगळी धामणगावचे गुगळेश्वर तसेच; तिडी पिंपळगावच्या आई जगदंबेचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या निमित्ताने गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदानासाठी विशेष आवाहन करण्यात आले.
या वेळी बाजार समितीचे माजी सभापती दिनकर भाऊ वाघ, रवींद्र डासाळकर, सुंदरराव गाडेकर, विठ्ठलराव ताठे, डॉ.आशिष डख, सेलू भाजपचे प्रभारी तालुकाध्यक्ष ॲड. दत्ता कदम, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, अजय डासळकर उपजिल्हाप्रमुख, जयसिंग शेळके जिल्हा चिटणीस भागवत दळवे भाजप किसन मोर्चाचे दगडोबा जोगदंड, पंजाबराव पवार, पाडुरंग गजमल, दत्तराव तांबे, कैलास ताठे, अजित मोगल, रावसाहेब बुरेवार, दामोदर बापू दळवे, दीपक दायमा, सुदाम रोकडे, मुरली गोरे, विठ्ठल मगर, गणेश काटकर, मणिक डख रामा डख आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हळदीतून एकरी अडीच लाखांचे उत्पन्न; आडळकरांचा सेंद्रिय शेती प्रयोगाला यश