महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सेलूत विविध कार्यक्रम; भव्य मिरवणूक
लेझीम पथक, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष,
सेलू : महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सेलू शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे शुक्रवारी, १४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. नूतन महाविद्यालय विद्यार्थी समिती व सेलूकरांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
नूतन महाविद्यालय विद्यार्थी समिती व सेलूकरांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नगरपालिका परिसरातील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास क्रेनच्या साहाय्याने भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र शिंदे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ आशिष डख, डॉ.ऋतुराज साडेगावकर, माजी सभापती दिनकर वाघ, अशोक काकडे, ॲड. दतराव कदम, विष्णू ढोले , रूपाली ठाकूर, निर्मला लिपणे, रामेश्वर गटकळ, जयसिंग शेळके, कपिल फुलारी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे, शिवाजी आकात, अशोक उफाडे, रघुनाथ बागल,अर्जुन बोरुळ, अर्जुन बावीसे, विठ्ठल कोकर, राहुल जाधव गोटू धापसे व विद्यार्थी समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. ढोलताशाच्या तालावर तरुणाई थिरकत होती. या मिरवणुकीत महिला मुलींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सर्वोदयनगर येथे मिरवणुकीतील भव्य प्रतिमांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत 70 मुलींचे लेझीम पथक, 40 विद्यार्थींनीचे ध्वजपथक, ढोल पथक, भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार, भगवान बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, महापुरुषाचे सजीव देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीमध्ये तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, बालू झमखडे, कृष्णा काटे, नरसिंग हरणे, आजी माजी विद्यार्थी आदित्य अंभोरे, निखिल पहाडे, अनिकेत पांडागळे रितेश आठवे, कृष्णा रोडगे, संभाजी रोडगे, अनिरुद्ध मगर, हितेश पारपियानी, निलेश धापसे, वरद काकडे, श्रीकांत झुटे, नाथा खांडेकर आदींनी परिश्रम घेऊन मिरवणूक यशस्वी केली मोठ्या संख्येने विद्यार्थी व समाज बांधव यांची उपस्थिती होती
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, मुख्याधिकारी देविदास जाधव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, मारोती चव्हाण, प्रभाकर सुरवसे, मनीष कदम, गौतम धापसे,सचिन कोरडे, सतीश जाधव आदींची उपस्थिती होती.