सेलूतील ‘नूतन’च्या बालवाड्यांचे वासंतिक शिबिर उत्साहात
सौ.सावित्रीबाई बिहाणी नूतन पूर्व प्राथमिक शाळेचा उपक्रम, मान्यवरांची उपस्थिती
सेलू : येथील सौ. सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या पूर्वप्राथमिक विभागाचे वासंतिक शिबीर उत्साहात झाले. शुक्रवारी, १४ एप्रिल रोजी समारोप झाला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख पाहुण्या ॲड.पौर्णिमा प्रदीप जोहिरे यांची उपस्थिती होती. सदस्य राजेश गुप्ता, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी, छाया बोबडे शिल्पा पिंपळे, श्रृती कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोपप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या ॲड.पौर्णिमा प्रदीप जोहिरे म्हणाल्या, की संस्कारातून शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. शिक्षकांवर विश्वास ठेवावा. आई सर्वात मोठी शिक्षका आहे. बालकांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये मध्ये विश्वासाचे निर्माण करा.
८ ते १४ एप्रिल या कालावधीत वासंतिक शिबीरामध्ये प्रार्थना, योगासने, गाणी, गोष्टी, हस्तकला, आनंदबाजार व मनोरंजक खेळ यांचा बालकांनी आनंद घेतला. समारोपप्रसंगी बालकांचे कौतुक करण्यात आले. शिबाराच्या यशस्वीतेसाठी ए.जी.पवार, एस.बी.देवकर, एम.डी. बायस ठाकूर, एस.एम.कुलकर्णी, ए. एन.पवार, एम. ई. होलिया, बी.आर. भांडवले, आर.व्ही. गात, पी.बी.पवार यांनी पुढाकार घेतला.
बालकांमध्ये संस्कार रुजवा : पौर्णिमा जोहिरे
प्रमुख पाहुण्या ॲड.पौर्णिमा प्रदीप जोहिरे म्हणाल्या, की संस्कारातून शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. शिक्षकांवर विश्वास ठेवावा. आई सर्वात मोठी शिक्षका आहे. बालकांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये मध्ये विश्वासाचे निर्माण करा.