संस्कारासाठी शिबिरांची गरज : आनंद देशमुख; विवेकानंद शाळेत शिबिराचा समारोप
विविध उपक्रमांचे आयोजन, शिबिरार्थींनी घेतला आनंद
सेलू : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील वासंतिक बालसंस्कार शिबिराच्या समारोपानिमित्त शाळेचे सभासद तथा भारतीय बालविद्या मंदिर, परभणी येथील माजी मुख्याध्यापक आनंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यासपीठावर स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, स्थानिक सभासद अनिल वाडकर, मुख्याध्यापक शंकर शितोळे, राजपुरोहित यांची उपस्थिती होती. वासंतिक बालसंस्कार शिबीर दिनांक १२ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान होते. महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल यावर शिबिराची मुख्य कल्पना राबवलेली होती. त्यासाठी शिबिराच्या पहिल्या दिवशी सुभाष मोहकरे, दुसऱ्या दिवशी शालिग्राम मुळे तिसऱ्या दिवशी डॉ.काशिनाथ पल्लेवार यांनी पुष्प गुंफले. समारोपाच्या दिवशी आनंद देशमुख यांनी महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल या विषयावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना श्री देशमुख म्हणाले की, माणूस जोडला की देश जोडला जातो. बालवयात संस्कार मिळण्यासाठी अशा शिबिराची गरज आहे जे आपला इतिहास विसरले. त्यांचा भूगोल लहान झाला असेही प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोपात स्थानिक कार्यवाह श्री बेल्लूरकर यांनी चारित्र्यसंवर्धनाची गरज व्यक्त केली.अशा शिबिरातून चारित्र्यसंवर्धन हा संस्कार रुजवता येतो असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन साळवे यांनी केले तर प्रास्ताविक शिबिर प्रमुख विनोद मंडलिक यांनी केले. महाराष्ट्र गीत व आभार विजय चौधरी यांनी व्यक्त केले. शिबिर यशस्वीतेसाठी रागिणी जकाते, अनिल कौसडीकर,शंकर राऊत, अभिषेक राजूरकर, काशीनाथ पांचाळ, शारदा पुरी, सोनाली जोशी, स्वप्नाली देवडे, विशाल सोनवणे यांनी प्रयत्न केले.