साईबाबा बँकेला 3 कोटी 43 लाखांचा नफा : हेमंतराव आडळकर; ठेवी 200 कोटींच्या घरात 

साईबाबा बँकेला 3 कोटी 43 लाखांचा नफा : हेमंतराव आडळकर; ठेवी 200 कोटींच्या घरात 

निव्वळ नफा 1 कोटी 53 लाख, ठेवी 200 कोटींच्या घरात, कर्ज वाटप 112 कोटी 74 लाख

सेलू जि.परभणी :  सलग सातवेळा बँको पुरस्कारप्राप्त येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला मार्च 2023 अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1 कोटी 53 लाख रूपये निव्वळ नफा झाला आहे, तर सकल ढोबळ नफा 3 कोटी 43 लाखांवर पोहोचला आहे.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी शनिवारी, १५ एप्रिल रोजी ही माहिती दिली. संपलेल्या आर्थिक वर्षात बँक कडे भाग भांडवल 5 कोटी 33 लाख रुपये आहे. एकूण निधी 1260 लक्ष आहे. मार्च अखेर ठेवी 190 कोटी 46 लक्ष आहेत. कर्ज वाटप 112 कोटी 74 लक्ष आहेत. बँकेचे नेट एनपीए 0.49 टक्के ग्रॉस एनपीए 6.22 टक्के आहे. बँकेच्या सर्व शाखा नफ्यात आहेत. यापुढे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राहील यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली.

बँकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या एटीएम, पीओएस, इ.कॉम, मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, आरटीजीएस, युपीआय अशा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांचा ग्राहकांनी अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी केले आहे. बँकेच्या सर्व स्तरावरील प्रगतीमध्ये बँकेचे सभासद, संचालक मंडळ, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारी यांनी केलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे आदींची उपस्थिती होती.

बँकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या एटीएम, पीओएस, इ.कॉम, मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, आरटीजीएस, युपीआय अशा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांचा ग्राहकांनी अधिकाधिक उपयोग करावा, बँकेच्या सर्व स्तरावरील प्रगतीमध्ये सभासद, संचालक मंडळ, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारी यांचे अमूल्य योगदान व सहकार्याबद्दल कृतज्ञता.

– हेमंतराव आडळकर, अध्यक्ष, साईबाबा नागरी सहकारी बँक, सेलू जि.परभणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!