सन्मान कर्तृत्वाचा : विविध क्षेत्रांतील कर्तृत्वांचा सेलूत सन्मान; काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

सन्मान कर्तृत्वाचा : विविध क्षेत्रांतील कर्तृत्वांचा सेलूत सन्मान; काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

आमदार बाबाजानी दुर्राणी, नामदेव महाराज ढवळे, विजय भांबळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती

सेलू जि.परभणी : महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेतर्फे विविध क्षेत्रांतील वीस कर्तृत्ववान व्यक्तींना सोमवारी (१७ एप्रिल) सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी होते. या वेळी नामदेव महाराज ढवळे, माजी आमदार विजय भांबळे, संस्थेचे अध्यक्ष तथा संयोजक अशोक काकडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, राजेंद्र लहाने, उद्योजक ब्रिजगोपाल काबरा, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, शफीक अली खान, रणजित गजमल, पुरुषोत्तम पावडे, शिला काकडे, प्रा.के.डी.वाघमारे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात हवामान तज्ज्ञ पंजाब डख, पत्रकार नारायण पाटील, सानेगुरुजी कथामालेच्या कल्पना दत्तात्रय हेलसकर, गायक नरेंद्र राठोड, युवराज माने, डॉ.सतीश लिपणे, रामेश्वर गटकळ, गोसेवक राजेंद्र कर्वा, पार्वतीबाई गोरे, किशोर साळवे, पंढरीनाथ काकडे, डॉ.मुज्जमिलखान, डॉ.प्रियंका वाघमारे- लोखंडे, शिवाजी शिंदे, अर्जुन पौळ, जकी महमंद, श्रीकांत वाकडीकर, लक्ष्मण कुकडे, नीता आचलिया आदींसह यशोधरा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अभिजित खरात यांच्या ‘बापाचा रान ऐढा’ या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. संयोजक अशोक काकडे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नरेंद्र राठोड व संचाने गाणी सादर केली. प्रास्ताविक अशोक उफाडे, सूत्रसंचालन मोहन बोराडे, तर राधाकिसन महाराज यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संतोष कुलकर्णी, रघुनाथ बागल, शिवाजी गजमल, बाबासाहेब हेलसकर, सुधाकर रोकडे, प्रसाद खारकर, वरद काकडे, सिद्धू शिंदे, किशोर कटारे आदींसह संयोजन समितीने परिश्रम घेतले.

सन्मान कर्तृत्वाचा : विविध क्षेत्रांतील कर्तृत्वांचा सेलूत सन्मान; काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

प्रयत्नांना कष्ट, मेहनतीची जोड दिली, तर प्रत्येकाला जीवनात यश मिळविता येते, अशी शेकडो उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आधी स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला ‘कोणाचा जय’ करायचा आहे ते करा, असे मत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी व्यक्त केले. माजी आमदार विजय भांबळे यांनी स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून सन्मानार्थींचे अभिनंदन केले. राजेंद्र लहाने यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

सन्मान कर्तृत्वाचा : विविध क्षेत्रांतील कर्तृत्वांचा सेलूत सन्मान; काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

छायाचित्रे : शंभू काकडे, सेलू


साईबाबा बँकेला 3 कोटी 43 लाखांचा नफा : हेमंतराव आडळकर; ठेवी 200 कोटींच्या घरात

संस्कारासाठी शिबिरांची गरज : आनंद देशमुख;  विवेकानंद शाळेत शिबिराचा समारोप

सेलूतील ‘नूतन’च्या बालवाड्यांचे वासंतिक शिबिर उत्साहात

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!