सेलूतील जिल्हा विज्ञान प्रदर्शन उत्साहात; वरद, शर्मिष्ठा, समृद्धी, वैष्णवीच्या उपकरणांची बाजी
आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह विज्ञानप्रेमींची उपस्थिती; कीर्ती राऊत,ए.बी केंद्रे, महेश हजारे यांचे शैक्षणिक साहित्यही ठरले विजेते
सेलू : सेलू (जि.परभणी ) येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या विद्याविहार संकुलामध्ये गुरूवारी,20 एप्रिल रोजी आयोजित ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून सेलूच्या प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या वरद सारडाने प्रथम, नूतन कन्या प्रशालेच्या समृद्धी लायेने द्वितीय, भारतीय बाल विद्या मंदिर परभणीच्या श्रेया गडदेने तृतीय व माध्यमिक गटातून व्हीजन पब्लिक स्कूलची शर्मीष्ठा रोडेने प्रथम, शांताबाई नखाते विद्यालय वालूरच्या वैष्णवी इबीतवारने व्दितीय, ज्ञानतीर्थ विद्यालय सेलूच्या प्रताप पौळने तृतीय क्रमांक मिळविला आह, तर शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्राथमिक गटातून नूतन कन्या प्रशाला सेलू येथील कीर्ती राऊत यांनी प्रथम, तर माध्यमिक गटातून एकलव्य बाल विद्या मंदिर जिंतूर येथील ए.बी केंद्रे यांनी प्रथम, तसेच प्रयोगशाळा सहाय्यक मधुन नूतन विद्यालयच्या महेश हजारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी व सेलू येथील एल.के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कुल व जुनिअर कॉलेज यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, तर उदघाटक म्हणून जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, प्रमुख म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक गोविंद मोरे, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, परीक्षक सुरेश कवडे, भगवान क्षीरसागर, अमित कुलकर्णी, सुमित आवटे, प्राचार्य प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला, शालिनी शेळके आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करतांना आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, की विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील बालवैज्ञानिकांमधील कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर परभणी जिल्ह्याचे नाव उंचवाविव्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्युरिअस किड्स या नामांकित अंगणवाडीची केंद्र राज्यस्तरावरील मंत्री महोदयांशी चर्चा करुन येत्या वर्षभरात ती प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी प्रयत्न कररण्यात येतील..
विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत.चला शिकूया वैज्ञानिकांची जयंती हे दोन उपक्रम शिक्षणाबाबत चालू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल, अशी असे मत डॉ.संजय रोडगे यांनी या वेळी व्यक्त केले. विठ्ठल भुसारे, गजानन वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक 28, माध्यमिक 28, शैक्षणिक साहित्य गटातून 6, लोकसंख्या शिक्षण व प्रयोगशाळा परिचर गटातून 2 उपकरणांची सहभाग नोंदविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सेलू शहर व तालुक्यातील विज्ञानप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन बालवैज्ञानिकांचा उत्साह वाढविला. प्रारंभी दीपप्रज्वलन व सी.व्ही.रमण व डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.प्रास्ताविक आशा गरूड यांनी केले. सूत्रसंचालन संजय ठाकर,तर डिगांबर टाके यांनी आभार मानले.
विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण, स्वच्छता, सौर उर्जा, आरोग्. शेती या अनुषंगाने बहुगुणी छत्री, होलोग्राम बॉक्स, डोंगरावरील वळण रस्त्यावर अपघात टाळणारे यंत्र, पर्यावरण पूरक शहर, रेल्वे भुयारी मार्गातील अपघात टाळण्यासाठी, फरशी स्वच्छ करण्यासाठी यंत्र, शेती रक्षक काठी, वीजेची बचत, सोलार सिटी, सौरउर्जेवर चालणारी बोट, इलेक्ट्रीक सायकल आदी विविध प्रयोग सादर करण्यात आले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांच्या साहित्यामध्ये बालविवाह मुक्ती, तापमान वाढ, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रकाशाचे गुणधर्म, गणितातील गमतीजमती, कीर्ती राऊत यांच्या नूतन शैक्षणिक जत्रेला भरूभरून प्रतिसाद मिळाला.