कॉंंटे की टक्कर : सेलू बाजार समितीच्या 18 जागांसाठी 38 जण रिंगणात, 78 जणांची माघार
महाविकास आघाडी व भाजपाच्या पॅनलमध्ये सरळसरळ लढतीचे चित्र स्पष्ट
सेलू : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालकांच्या जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. छाननीनंतर 119 अर्ज वैध ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत 20 एप्रिलपर्यंत 78 जणांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी दिली आहे. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी झाली होती.
अंतीम यादी या प्रमाणे आहे : सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण : प्रमिला दिनकर वाघ, अनिल रामराव पवार, राजेभाऊ भाऊसाहेब कदम, संजय रावसाहेब वाघ, राजेंद्र राधाकिशन लहाने, पंढरीनाथ कोंडीबा टाके, ग्यानदेव दत्तराव जायभाये, दत्ता नारायण कदम, संजय रामराव रोडगे
गणेश भानुदास आकात, प्रसाद भगवानराव डासाळकर, पुरुषोत्तम दत्तात्रय पावडे, लता बालासाहेब गजमल, प्रसन्न प्रकाशराव सिमनगांवकर, बाबासाहेब सुखदेव पाटील, सहकारी संस्था महिला राखीव : सुरेखा सुंदर गाडेकर, गोकर्णा भास्करराव पडघन, वर्षा केशव सोळंके, मीना अशोकराव खरात, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय : लहानप्पा विठठलराव हारकळ, छाया ज्ञानेशवर राऊत, सहकारी संस्था भ.जा.वि.ज.वि.मा.प्र. : सुदाम बलभीम रोकडे, प्रकाश धोंडीबा मुळे, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण : गजानन ग्यानोजी डोंबे, रामा शेषेराव डख, नामदेव माणिकराव डख, चक्रधर गुलाबराव पौळ, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती : गोरखनाथ मल्हारी भालेराव, लक्ष्मीबाई लक्ष्मण तांबे, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक : अनिता ज्ञानेश्वर ताठे, शिवहरी विलासराव शेवाळे, व्यापारी व आडते : शैलेश सुरेंद्र तोष्णीवाल, रामेश्वर मुरलीधर राठी, ओमप्रकाश रामचंद्रजी तोष्णीवाल, दीपक गोवर्धनजी दायमा, हमाल व तोलारी : अनिल नारायण बरडे, राम रतनराव शेलार, विशाल विठठलराव खांडेकर