सेलूत जूनपासून बी.फार्मसी शिक्षणाची सोय; श्रीराम प्रतिष्ठानला अभ्यासक्रमाची मान्यता
अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांची माहिती, प्रवेश प्रक्रिया जूनपासून
सेलू जि.परभणी : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या द्वारे श्रीराम प्रतिष्ठान संचालित आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी.फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळालेली आहे. येत्या जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी शुक्रवारी, २१ एप्रिल रोजी ही माहिती दिली आहे.
सेलू व परिसरातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरामध्ये जे औषधनिर्माणशास्र शिक्षण दिले जाते. त्याच धरतीवर आता विद्यार्थ्यांना सेलू शहरामध्ये औषधनिर्माणशास्र पदवीचे शिक्षण घेता येणार आहे, असे डॉ.रोडगे म्हणाले. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया येत्या जुनपासून सुरु होणार असून, विद्यार्थ्यांनी एकवेळ महाविद्यालयातील उपलब्ध भौतिक तथा शैक्षणिक सुविधा बघून आपला प्रवेश निश्चित करावा; तसेच सेलूमधील पहिले व एकमेव असलेल्या या औषधनिर्माणशास्र पदवी अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान यानिमित्ताने डॉ.संजय रोडगे यांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, डॉ.नीलिमा सिंह, प्रा.अशोक बोडखे, प्रा.बाजीराव मोगल, प्रा.नारायण चौरे व श्रीराम प्रतिष्ठान संचालित सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.