महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात, शिवा संघटनेतर्फे सेलूत कार्यक्रम

महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात, शिवा संघटनेतर्फे सेलूत कार्यक्रम

बसवेश्वर चौकातही कार्यक्रम, मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

सेलू,जि.परभणी : शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांची 892 वी जयंती शनिवारी, 22 एप्रिल रोजी हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. कामगार कल्याण केंद्राच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. या वेळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती प्रसिद्ध व्यापारी श्रीनिवासअप्पा रुगले, सीमा रुगले यांच्या हस्ते करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून बी.एस.केदारी, शिवशंकरअप्पा महाजन,गणपतअप्पा मिटकरी, परमेश्वर कदम आदींची उपस्थिती होती. या वेळी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्र व महतीवर शिवा कर्मचारी आघाडीचे कैलासअप्पा मलवडे यांनी प्रकाश टाकला. बी.एस.केदारी,शिवशंकरअप्पा महाजन, गणपतअप्पा मिटकरी यांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून समाजाप्रती झालेल्या कार्याचा भाषणातून गौरव केला. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. श्रीनिवासअप्पा रुगले यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, समाजातील जेष्ठ व्यक्तींनी सामाजिक घडामोडींचे व्यवस्थित अवलोकन करुनच् नवीन पिढीसमोर व्यक्त झाले पाहीजे. या वेळी तालुका प्रमुख निजलिंगअप्पा तरवडगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रदीप डफुरे यांनी केले. सूत्रसंचालन परभणी जिल्हा उपप्रमुख शिवकुमार नावाडे, आभार बालासाहेब क्षीरसागर यांनी मानले. अशोकअप्पा मसुरे, शंकरअप्पा राऊत, सुजीत मिटकरी, बबनअप्पा झमकडे, सुनील नवघरे, गुरुबसअप्पा पंचगल्ले, अरुण वीर, सदाशिव क्षीरसागर, नवनाथ सोनटक्के, विनोद भगत, गणेश केशरखाने, देवराव चौरे, मनोहर चलोदे, रामदास पाटील, महेश महाजन आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!