अध्यक्षपदी माधव लोकुलवार विजयी, सिरसकर सचिव : परभणी पोलिस पतसंस्था पदाधिकारी निवडणूक
आठ विरूद्ध पाच मतांनी विजय, उपाध्यक्षपदी महेशकुमार पांगरकर
परभणी : येथील परभणी पोलीस सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माधव लोकुलवार, उपाध्यक्षपदी महेशकुमार पांगरकर, तर सचिव म्हणून नरेश सिरसकर यांचा आठ विरूद्ध पाच मतांनी विजय झाला आहे.
२०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संचालकांच्या १३ जागांसाठी दोन एप्रिल झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलने बहुमत मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पॅनलचे तेरा पैकी आठ उमेदवार विजयी झाले आहेत.
नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी मंगळवारी (२५ एप्रिल) नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. नवनिर्वाचित तेराही संचालक उपस्थित होते. तीन पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये
विकास पॅनलचे प्रमुख माधवअण्णा लोकुलवार यांची अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी महेशकुमार पांगरकर, तर सचिव म्हणून नरेश सिरसकर यांचा आठ विरूद्ध पाच मतांनी विजय झाला आहे. यावेळी सदाशिवबापू काळे, नाथराव उपलेचवार, बालाजी कच्छवे, दीपक केजगीर, शंकर गायकवाड, गजानन क्षीरसागर, जयश्री राठोड संघमित्रा होळकर, सदाशिव काळे, संतोष नीलपत्रेवार हेमराज नैताम आदी नवनिर्वाचित संचालकांची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष काळे यांनी काम पाहिले.
परभणी मेडिकल कॉलेजला अडथळे आणू नका : खासदार संजय जाधवांचा राज्यसरकारला इशारा