सेलूतील आदित्य बी.फार्मसी कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन; आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती

सेलूतील आदित्य बी.फार्मसी कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन; आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती

श्रीराम प्रतिष्ठानमध्ये औषध  निर्माणशास्त्र पदविका व पदवी शिक्षणाची सोय होणार, जूनपासून प्रवेश प्रक्रिया

सेलू जि.परभणी : श्रीराम प्रतिष्ठान संचालित आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शनिवारी, 22 एप्रिल रोजी झाले. सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविताताई रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ.रामराव रोडगे, डॉ.ऋतुराज साडेगावकर, रवींद्र डासाळकर, जयसिंग शेळके, प्रफुल्ल बिनायके, ॲड.दत्तराव कदम, कपिल फुलारी, दीपक रोडगे, गणेश रोडगे, गुलाबराव रोडगे, प्रदीप रोडगे, बालासाहेब गजमल,  प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य  कार्तिक रत्नाला, डॉ.नीलिमा सिंग डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, प्रा.अशोक बोडखे व श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, श्रीराम प्रतिष्ठान हे नेहमीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेलू व परिसरामध्ये अग्रेसर राहिलेले आहे. यात आणखी भर म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी हे शिक्षण घेता येणार आहे. भविष्यामध्ये डॉ.संजय रोडगे यांच्या हातून अशीच सामाजिक शैक्षिणक व राजकीय जनसेवा घडो, अशा शब्दात बोर्डीकर यांनी शुभेच्छा दिल्या.

 

देवाच्या इच्छेनुसार जगा,जीवन नितांत सुंदर; सेलूतील ब्रह्माकुमारी केंद्राचे सौहार्द सम्मेलन उत्साहात

सेलूत जूनपासून बी.फार्मसी शिक्षणाची सोय; श्रीराम प्रतिष्ठानला अभ्यासक्रमाची मान्यता

सेलूतील जिल्हा विज्ञान प्रदर्शन उत्साहात; वरद, शर्मिष्ठा, समृद्धी, वैष्णवीच्या उपकरणांची बाजी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!