गौरवास्पद : परभणीतील आठ पोलिसांना महासंचालकांचे पदक; उल्लेखनीय कामगिरीची दखल

गौरवास्पद : परभणीतील आठ पोलिसांना महासंचालकांचे पदक; उल्लेखनीय कामगिरीची दखल

डीवायएसपींसह सात पोलिस हवालदार, महिला हवालदारांचा सन्मान

गौरवास्पद : परभणीतील आठ पोलिसांना महासंचालकांचे पदक; उल्लेखनीय कामगिरीची दखलगौरवास्पद : परभणीतील आठ पोलिसांना महासंचालकांचे पदक; उल्लेखनीय कामगिरीची दखल

परभणी : उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारे सन २०२२ या वर्षासाठीचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र परभणी जिल्ह्यातील आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहे. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी याबाबत आदेश जारी केले आहेत. पोलिस विभागात विविध प्रवर्गात केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. परभणी ग्रामीण व शहर पोलिस उपअधीक्षक राजेंद्र श्रीरंग शिरतोडे, नागरी हक्क संरक्षण विभागातील उपनिरीक्षक अब्दुल रियाज अब्दुल जलील, दीपक साबळे, पोलिस हवालदार शिवदास धुळगुंडे, गणेश कौटकर, राजू कांबळे, बालाजी कच्छवे, वंदना नाथभजने यांचा यात समावेश आहे. सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

गौरवास्पद : परभणीतील आठ पोलिसांना महासंचालकांचे पदक; उल्लेखनीय कामगिरीची दखलगौरवास्पद : परभणीतील आठ पोलिसांना महासंचालकांचे पदक; उल्लेखनीय कामगिरीची दखलगौरवास्पद : परभणीतील आठ पोलिसांना महासंचालकांचे पदक; उल्लेखनीय कामगिरीची दखल

पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त अधिकार्‍यामध्ये सेलू (जि.परभणी) येथील रहिवासी व सध्या गडचिरोली येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत प्रणिल प्रफुल्ल गिल्डा तसेच; नांदेड येथे प्रतिनियुक्तीवर असलेले परभणीचे पोलिस हवालदार सुयोग गडम यांचादेखील समावेश आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!