Science Exhibition : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या ‘लायफाय’ ची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड
शाळेचा प्रयोग पाचव्यांदा राज्यस्तरावर, संस्थेकडून बालवैज्ञानिकांचे कौतुक
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ‘लायफाय’ प्रयोगाची पाचव्यांदा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
राज्य शिक्षण संस्था रवी नगर नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी व सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ५० वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या अभय अतकरे, वरद सारडा, कृष्णा तायनाक या विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांनी ‘लाईफाय’ नावाचा प्रयोग सादर केला. ‘लायफाय’ दोन डिव्हाईसमध्ये डेटा हस्तांतरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले वायरलेस ऑप्टिकल नेटवर्किंग तंत्रज्ञान आहे. LiFi ( Light Fidelity) WiFi मध्ये डेटा हस्तांतरणासाठी रेडिओ वेव्हसचा माध्यम म्हणून वापर होतो, परंतु Lifi मध्ये Light म्हणजेच प्रकाशाचा वापर केला जातो.
याचा फायदा LiFi Technology च्या साहाय्याने २२४ जीबी डेटा प्रति सेकंद ट्रान्सफर करणे शक्य झाले आहे. वेगवान स्पीड हा LiFi चा सर्वात मोठा फायदा आहे. शिवाय डेटा ट्रान्सफर प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असते. LiFi डिव्हाईसेस कार्य करण्यासाठी कमी ऊर्जा वापरतात. त्यामुळे Internet of Thinks मध्ये ही वापरली जातात. LiFi तंत्रज्ञान ऑप्टिकल बँडवर कार्य करते. ऑप्टिकल बँड आरोग्यासाठी हानीकारक नसतो.
या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक नारायण चौरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ.रामराव रोडगे,डॉ. आदित्य रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वेगवान स्पीड हा LiFi चा सर्वात मोठा फायदा आहे. शिवाय डेटा ट्रान्सफर प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असते. LiFi डिव्हाईसेस कार्य करण्यासाठी कमी ऊर्जा वापरतात. त्यामुळे Internet of Thinks मध्ये ही वापरली जातात. LiFi तंत्रज्ञान ऑप्टिकल बँडवर कार्य करते. ऑप्टिकल बँड आरोग्यासाठी हानीकारक नसतो.