Science Exhibition : ‘समृद्धी’चा प्रयोग, राऊत यांची ‘शैक्षणिक जत्रा’ राज्यस्तरावर;सेलूतील नूतन कन्या शाळेचे यश 

Science Exhibition : ‘समृद्धी’चा प्रयोग, राऊत यांची ‘शैक्षणिक जत्रा’ राज्यस्तरावर;सेलूतील नूतन कन्या शाळेचे यश 

सेलू : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठानच्या विद्याविहार संकुलात 50 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नूतन कन्या प्रशालेच्या समृद्धी शरद लिये ( वर्ग 7 वा) हिच्या प्रयोगाची आणि प्रशालेतील कीर्ती राऊत यांच्या प्राथमिक गटातील नूतन शैक्षणिक जत्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
समृद्धीला वैशाली चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वितांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव प्राचार्य व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, कार्यकारणी सदस्य दत्तराव पावडे, प्राचार्य शरद कुलकर्णी, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक डी.बी.घोगरे, पर्यवेक्षक आर.एस.मोगल आदींनी अभिनंदन केले आहे. विज्ञान विभाग प्रमुख शंकर बोधनापोड, जाधव पंडित, गणित विभाग प्रमुख सुहास देऊळगावकर, भालचंद्र गांजापुरकर, किशोर ढोके, प्रकाश खराटे, गजानन मजगे, ज्योती कुंभकर्ण, विनोद शिंदे, सुनील मोगल, विज्ञान तथा गणित विभागातील उपेंद्र दिवाळकर, शशिकांत देशपांडे, सतीश कुंडीकर, कैलास मलवडे, रेणुका आंबेकर, तसेच सुषमा दामा, बाबासाहेब थोरे, सुरेखा आगळे ,अनंत बोराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


सेलूतील जिल्हा विज्ञान प्रदर्शन उत्साहात; वरद, शर्मिष्ठा, समृद्धी, वैष्णवीच्या उपकरणांची बाजी 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!