बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे संस्कार शिबिर उत्साहात

बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे संस्कार शिबिर उत्साहात

विविध ज्ञानवर्धक, मनोरंजक उपक्रमांचे आयजन

सेलू,जि.परभणी : येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित वासंतिक शिबिर उत्साहात संपन्न झाले. शिबिराच्या समारोप २५ एप्रिल रोजी पार पडला. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मकरंद दिग्रसकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे यांची उपस्थिती होती. शिबिरात ज्ञानवर्धक कार्यक्रम, ध्यान, प्रार्थना, स्तोत्र, नृत्य, योगा आदी उपक्रम घेण्यात आले. याप्रसंगी दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मकरंद दिग्रसकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक रामकोर कुंभार यांनी केले.‌सूत्रसंचालन सोनाली कुबरे,तर मनीषा गजमल यांनी आभार मानले. शिबिरासाठी अनिल रत्नपारखी, सविता डाफणे, रेखा डोळस, शिंदे, शितल शेळके, संपदा जहागीरदार, प्रल्हाद पवार तसेच शिक्षकांनी पुढाकार घेतला.

बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे संस्कार शिबिर उत्साहात

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!