पोलिस भरती : विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे ४१ पोलिसांचा सन्मान

पोलिस भरती : विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे ४१ पोलिसांचा सन्मान

सेलू जि.परभणी : नुकत्याच लागलेल्या पोलिस भरतीच्या निकालामध्ये सेलू तालुक्यातील गटकळ करियर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. पोलिस पदाकरीता निवड झालेल्या ४१ जणांचा यथोचित सन्मान विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी, १८ मेरोजी सायंकाळी करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मारुती चव्हाण, प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, वहीद अन्सारी, मिलिंद सावंत, राजेंद्र पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे गटकळ करियर अकॅडमीचे प्रमुख रामेश्वर गटकळ सर्व शिक्षक व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह विनोद बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

४१ विद्यार्थ्यांची निवड ही सेलू शहरासाठी अभिमानाची व  कौतुकाची बाब आहे. शहराच्या लौकाकात निश्चितच भर घालणारी आहे,अशा शब्दांत विनोद बोराडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विठ्ठल काळबांडे, गौतम धापसे, दिलावर शेख, डॉ.विलास मोरे , रेवणअप्पा साळेगावकर,‌ किशोर कटारे, सतीश जाधव,सुनील गायकवाड ,सचिन कोरडे, विष्णू इंगोले, ऋषी अंभोरे, रमेश दौड, शंकर राऊत, मोहन समुद्रे, इरफान पठाण, पांडुरंग गव्हाडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

४१ विद्यार्थ्यांची पोलिस पदासाठी निवड ही सेलू शहरासाठी अभिमानाची व कौतुकाची बाब आहे. शहराच्या लौकाकात निश्चितच भर घालणारी आहे,अशा शब्दांत विनोद बोराडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



द्वेषाचे वातावरण निवळावे; गांधीवादी विचारवंत आशा बोथरा यांचे मत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!