सेलूच्या सभापतीपदी चक्रधर पौळ, प्रकाश मुळे उपसभापती; विजयाचा महाविकास आघाडीकडून जल्लोष
सेलू जि.परभणी : सेलू ( जि.परभणी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे चक्रधर पौळ, तर उपसभापतीपदी प्रकाश मुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचे डॉ.संजय रोडगे व प्रसाद डासाळकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सभापती, उपसभापती निवडीसाठी शनिवारी, २० मेरोजी दुपारी साडे बारा वाजता नवनिर्वाचित संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. निर्धारित वेळेत मतदानाची प्रक्रिया हात वर करून घेण्यात आली.
सभापती व उपसभापती पदासाठी दाखल अर्जामध्ये महाविकास आघाडी पॅनलच्या दोन्ही उमेदवारांना १८ पैकी बारा-बारा मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना सहा-सहा मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर होते. सचिन लोणीकर, किरण देशमुख यांनी साहाय्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, राष्ट्रवादीचे नेते अशोक काकडे, नामदेवराव डख, बाजार समितीचे सचिव राजीव वाघ, संचालक, कर्मचारी उपस्थितीत होते. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. दरम्यान , बाजार समितीत १८ पैकी, महाविकास आघाडी पुरूस्कृत १०, भारतीय जनता पक्ष पुरस्कृत ६, व्यापारी व आडते मतदारसंघातून दोन अपक्ष विजयी झालेले आहेत. बैठकीला नवनिर्वाचित संचालक पुरुषोत्तम पावडे, राजेंद्र लहाने, वर्षा सोळंके, छाया राऊत, प्रकाश मुळे नामदेव डख, चक्रधर पौळ, गोरखनाथ भालेराव, अनिता ताठे हमाल व तोलारी मतदार संघातील अनिल बरडे, तसेच डॉ.संजय रोडगे गणेश आकात, दत्ता कदम, प्रसाद डासाळकर, अनिल पवार , गोकर्णा पडघन, व्यापारी व आडते मतदार संघातील अपक्ष संचालक शैलेश तोष्णीवाल, रामेश्वर राठी आदींची उपस्थिती होती.
Antarbharati : द्वेषाचे वातावरण निवळावे; गांधीवादी विचारवंत आशा बोथरा यांचे मत