तळागाळातील लाभार्थींपर्यंत शासकीय योजनांचा लाभ द्या : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

तळागाळातील लाभार्थींपर्यंत शासकीय योजनांचा लाभ द्या : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

सेलू,जिंतूर तालुक्यातील विविध कामांचा घेतला आढावा

सेलू : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना तात्काळ द्यावा तसेच सर्व प्रस्ताव निकाली काढावेत आणि गरजूंना लाभ द्यावा. सेलू-जिंतूर तालुक्यातील सर्व विभागातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी, २३ मे रोजी प्रशासनाला दिल्या.
सेलू येथील तहसील कार्यालयात विविध शासकीय योजनांची व कामांची आढावा बैठक आमदार बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. या वेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, मुख्याधिकारी देविदास जाधव, बाजार समिती संचालक डॉ.संजय रोडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी वीज दुरूस्तीचे कामे, स्वच्छतेची कामे पूर्ण करावीत. सेलू शहरात होणाऱ्या दुषीत पाणीपुरवठ्याबद्दल प्रशासनाने गांभीर्यांने घ्यावे. तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील नाला साफसफाई व अन्य स्वच्छताविषयक कामे करून घ्यावीक. अशा सूचना पालिकेच्या मुख्याध्यिकाऱ्यांना करण्यात आल्या. एमआरजीएसचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत. जलजीवन मिशन, पाणंद रस्ते, घरकुल कामे, आरोग्य, शिक्षण, महसूल, निराधार, परितक्ता महिला यासंबधीचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलद प्रयत्न करावेत. सर्व विभागीतील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, असे बोर्डीकर यांनी बैठकीत नमूद केले.


नवोदितांनी गांभीर्याने व्यक्त व्हावे : देविदास फुलारी; ‘मसाप’तर्फे देविदास कुलकर्णींना अभिवादन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!