‘नूतन’ने जपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा
स्थापनेपासूनचा आदर्श : सेलूतील नूतन विद्यालय कर्मचारी सहकारी पतपेढी संचालक निवडणूक
सेलू (जि.परभणी) : येथील ५२ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या नूतन विद्यालय कर्मचारी सहकारी पतपेढीने स्थापनेपासून संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडीची आदर्श परंपरा यंदाही जपली आहे.
३६ सभासदांनी ८ जानेवारी १९७१ रोजी पतपेढीची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन मुख्याध्यापक शंकरराव मंडलिक, सोनाजीपंत कुलकर्णी, गोविंदराव देशमुख, ना.तू.कुलकर्णी, एस.एम.मणियार, डी.के.देशपांडे, व्ही.एच.दातार, रा.ब.गिल्डा आदींनी यासाठी पुढाकार घेतला होता. सध्या नूतन विद्यालय, सौ.सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा, लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागातील एकूण १०८ कर्मचारी सभासद आहेत.
२०२३-२८ या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर १५ मे रोजी पदाधिकाऱ्यांचीही निवडणूक बिनविरोध पार पडली. पीठासन अधिकारी म्हणून सहाय्यक सहकार अधिकारी व्ही.जी.पिंगळे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित संचालक मंडळात नारायण सोळंके, बाबासाहेब हेलसकर, बन्सीलाल पद्मावत, सुनील तोडकर, अर्चना कुलकर्णी, अनुजा सुभेदार, एकनाथ जाधव, प्रशांत सावरगावकर, बापूसाहेब पानझडे, कल्पना चौधरी, यशवंत कुलकर्णी अनंत बोराडे, सतिश कुंडीकर, सीमा सुक्ते, रेणुका अंबेकर यांचा समावेश आहे, तर पदसिद्ध अध्यक्षपदी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपाध्यक्ष एकनाथ जाधव, चिटणीस यशवंत कुलकर्णी, खजिनदारपदी अनंत बोराडे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूरकर, मुख्याध्यापिका संगीता खराबे, सुखानंद बेंडसुरे आदिंसह सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक व पदाधिकाऱ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता आदींसह संस्था सदस्य, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणे, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविणे हा पतपेढीचा मुख्य उद्देश आहे. सरत्या आर्थिक वर्षाअखेर दहा कोटींवर भाग भांडवल, तर ९ टक्के दराने आठ कोटी रुपये कर्ज वाटप, ९ लाख ९६ हजार ६६३ रुपये नफा झाला. आठ टक्के दराने लाभांश वाटप झाले. ‘ब’ऑडिट वर्ग प्राप्त पतपेढीचा कारभार स्वभांडवलावर पारदर्शकपणे चालविला जातो हे विशेष.
नारायण सोळंके, अध्यक्ष पतपेढी, तथा मुख्याध्यापक, नूतन विद्यालय, सेलू
तलाठी बेपत्ताच; आजही नदीपात्रात शोध घेणार, जिंतूूर तालुक्यातील डिग्रस येथील घटना
प्रवाशांचे हाल : सेलू बसस्थानकाला कुलूप ठोकण्याचा भाजपाचा इशारा
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.व्यंकटेशन यांच्याकडून भाऊचा तांडा घटनेतील कुटुंबियांचे सांत्वन