प्रवाशांचे हाल : सेलू बसस्थानकाला कुलूप ठोकण्याचा भाजपाचा इशारा

प्रवाशांचे हाल : सेलू बसस्थानकाला कुलूप ठोकण्याचा भाजपाचा इशारा

धक्का गाड्या, रद्द बसफेर्‍याला प्रवाशी वैतागले

सेलू : सेलूकडील बस फेऱ्या रद्द होत आहेत. बस वेळेवर येत नाहीत. धक्का स्टार्ट व खराब स्थितीतील गाड्या सेलूकडे पाठवल्या जातात. गाड्यांची वाट पाहून सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.अशा आशयाचे निवेदन देत, सेलू येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सेलू बसस्थानकाला कुलूप ठोकण्याचा इशारा गुरुवारी, २५ मेरोजी दिला आहे.
सेलू येथील बसस्थानक प्रशासनामार्फत विभागीय नियंत्रक राज्य परिवहन विभाग परभणी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद म्हटले आहे, की सेलूकडील बस फेऱ्या रद्द होत आहेत. बस वेळेवर येत नाहीत. धक्का स्टार्ट व खराब स्थितीतील गाड्या सेलूकडे पाठवल्या जातात. गाड्यांची वाट पाहून प्रवाशांचे व बालकांचे हाल होत आहेत. परभणीकडे जाणाऱ्या बस फेऱ्या खूप कमी आहेत. बसस्थानकामध्ये अतिशय तोकडी आसन व्यवस्था आहे. ती पण मोडकळल्या अवस्थेत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्थानकात जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. धुळीमुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहेत. येत्या दोन दिवसात समस्या सोडाव्यात; अन्यथा बसस्थानकाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, शिवहरी शेवाळे, नागेश ठाकूर, संदीप बोकन, पंकज वायाळ, पवन धुमाळ, सुनील चव्हाण, अर्जून चव्हाण, गणेश गोरे आदींची उपस्थिती होती.


तलाठी बेपत्ताच; आजही नदीपात्रात शोध घेणार, जिंतूूर तालुक्यातील डिग्रस येथील घटना

‘नूतन’ने जपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!