तलाठी बेपत्ताच; नदीपात्रात आजही शोध घेणार, जिंतूूर तालुक्यातील डिग्रस येथील घटना

तलाठी बेपत्ताच; नदीपात्रात आजही शोध घेणार, जिंतूूर तालुक्यातील डिग्रस येथील घटना

वाळू तस्काराविरुद्ध कारवाई करतांना घडली घटना, एनडीआरएफ पथकाची सायंकाळपर्यंत शोधमोहिम, डिग्रस येथे महसूल अधिकारी होते तळ ठोकून

सेलू/परभणी : वाळू धक्यावर तस्कराविरूद्ध कार्यवाही करण्यासाठी गेलेला एक तलाठी पूर्णा नदीपात्रातील पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी, 25 मेरोजी जिंतूर (जि.परभणी) तालुक्यातील डिग्रस येथे सकाळी अकराच्या सुमारास घडली.‌ प्रशासनाने एनडीआरएफच्या मदतीने दिवसभर शोधमोहीम हाती घेतली. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत शोध लागला नाही. शुक्रवारी, 26 मेरोजी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार असल्याची माहिती रात्री सव्वा आठ वाजता महसूल प्रशासनाने दिली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास खोले आदींसह महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी सायंकाळपर्यंत डिग्रस येथे तळ ठोकून होते.

सुभाष होळ असे नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.डिग्रसजवळील पूर्णा नदीपात्रातील वाळू धक्क्यावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती‌ मिळाल्यानंतर वरिष्ठांना कळवून तलाठी सुभाष होळ, धनंजय सोनवणे व पोलीस पाटील यांचे पथक धक्यावर गेले. त्या ठिकाणी जिंतूर तालुक्याच्या अलीकडील भागातून वाळू उपसा बंद होता मात्र, नदीच्या पलीकडील सेनगाव तालुकाअंतर्गत वाळू धक्का चालू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. कॅनी यंत्राच्या साह्याने उपसा सुरू होता. कारवाई करण्यासाठी तलाठी सुभाष होळ नदीपात्रात उतरले. त्यांनी पोहत पैलकाठावर जाण्याचा प्रयत्न केला. नदीपात्रात अर्ध्यापेक्षा जास्त अंतर ते पार करून गेले. मात्र, पलिकडे पोहचले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच; पोहताना दम लागून सुभाष होळ नदीपात्रात बेपत्ता झाले असावेत, अशी माहिती सोबतच्या तलाठी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली. परभणी येथून एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले. शोध सूरू झाला. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत सुभाष होळ सापडले नाहीत. दरम्यान, घटनेची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार प्रशांत थारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास खोले, मंडळ अधिकारी प्रशांत राखे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल कर्मचारी, अधिकारी‌ डिग्रसमध्ये दिवसभर तळ ठोकून होते. मात्र, बेपत्ता तलाठी सुभाष होळ यांचा शोध लागला नाही. उद्या सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार असल्याची माहिती सेलूचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी गुरूवारी रात्री सव्वा आठ वाजता दिली.

कारवाई करण्यासाठी तलाठी सुभाष होळ नदीपात्रात उतरले. त्यांनी पोहत पैलकाठावर जाण्याचा प्रयत्न केला. नदीपात्रात अर्ध्यापेक्षा जास्त अंतर ते पार करून गेले. मात्र, पलिकडे पोहचले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच; पोहताना दम लागून सुभाष होळ नदीपात्रात बेपत्ता झाले असावेत, अशी माहिती सोबतच्या तलाठी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली.परभणी येथून एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले. शोध सूरू झाला. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत सुभाष होळ सापडले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.


‘नूतन’ने जपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा

प्रवाशांचे हाल : सेलू बसस्थानकाला कुलूप ठोकण्याचा भाजपाचा इशारा

बनावट बी-बियाणे, खते व औषधींवर कठोर प्रतिबंध घाला : सेलू तालुका दबावगटाची मागणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!