SSC Results : नूतन विद्यालयाची ‘ धनश्री’ सेलू तालुक्यातून अव्वल; वैद्यकीय क्षेत्रात करणार करिअर 

SSC Results : नूतन विद्यालयाची ‘ धनश्री’ सेलू तालुक्यातून अव्वल; वैद्यकीय क्षेत्रात करणार करिअर 

शाळा, संस्थेच्या वतीने गुणवंतांचे कौतुक, २२ विशेष प्रावीण्यासह १०६ विद्यार्थ्यांना प्रावीण्य श्रेणी

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री अशोक आकात हीने दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून सेलू तालुक्यातून अव्वल स्थान पटकावले आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणार असल्याचे धनश्रीने सांगितले. 

शाळेतून यश मुकुंदराव देवढे (९७.००) याने द्वितीय, तृतीय संकल्प रामवल्लभ राठी ( ९६.२०), तर गौरी गोपाल सोनी (९५.८०) चौथ्या व साक्षी रमेश मैड ९५.६० टक्के गुण मिळवून शाळेतून गुणानुक्रमे पाचवी आहे. मार्च २०२३ च्या शालांत परीक्षेत एकूण ४५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल ८४.१७ टक्के आहे. प्रावीण्य श्रेणीत १०६, प्रथम श्रेणी ११५, द्वितीय श्रेणीत ११०, तर पास श्रेणीत ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर गुण आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर आदींसह संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, कर्मचारी आदींनी कौतुक केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!