SSC Results : सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयाचा निकाल ९७ टक्के; रुचिता, मृण्मयी चमकल्या 

SSC Results : सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयाचा निकाल ९७ टक्के; रुचिता, मृण्मयी चमकल्या 

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत रूचिता गोंडगे व मृण्मयी वडकर ९६% घेऊन शाळेतून प्रथम व सृष्टी हुगे हीने ९४.८०% घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला.

दहावी बोर्ड परीक्षेत मानव गजमल ९४.४०%, दूर्वा घुमरे ९३.८०%, वैष्णवी मिसाळ ९३.४०%, श्रावणी मचाले ९३.२०, प्रथमेश नखाते ९२.८०%, चैतन्य गटकळ९२.४०%, आर्या रोडगे९०.६०%, आदित्य ताठे ९०.४०% यासोबतच एकूण ८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य यासह तर प्रथम श्रेणीत 33 विद्यार्थी गुण प्राप्त केले.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविताताई रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक करणसिंग चव्हाण, इंद्रजीत मोरे, गणेश येवले, हरिभाऊ कांबळे, रतन होंडे, धम्मपाल ठोके, शशिकांत बिहाडे , आकात तसेच शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!