SSC Results : सेलूतील नूतन कन्या शाळेचा निकाल ९० टक्के; इरा, प्रतीक्षा, श्रावणीची बाजी
सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेचा मार्च २०२३ च्या दहावी परीक्षेचा निकाल ९०.९६ टक्के आहे. इरा मोहन खापरखुंटीकर (९६.६०) गुण मिळवून शाळेतून सर्वप्रथम, प्रतीक्षा प्रदीप फंड (९६.२०) द्वितीय, श्रावणी दत्तात्रय हेलसकर (९५.८०) तृतीय, तर संचिता रामप्रसाद वाघ (९५.६०) हीने चौथा क्रमांक पटकावला आहे.
मार्च २०२३ च्या शालांत परीक्षेत प्रशालेच्या एकूण ३४३ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ३१२ उत्तीर्ण झाल्या आहेत. निकाल ९०.९६ टक्के आहे. प्रावीण्य श्रेणीत १०३, प्रथम श्रेणी ९१, द्वितीय श्रेणीत ९२, तर पास श्रेणीत २६ विद्यार्थ्यिंनीचा समावेश आहे. शनिवारी गुणवंतांच्या घरी जाऊन मुख्याध्यापिका संगीता खराबे व शिक्षकांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. पालकांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यिनींचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर आदींसह संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका संगीता खराबे, डी.बी.घोगरे, रोहिदास मोगल, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, कर्मचारी आदींनी कौतुक केले आहे.