सेलूतील उरुसानिमित्त मंगळवारपासून भरगच्च कार्यक्रम; सय्यद शाहबुद्दीन अवलिया साहेब उरुसाला प्रारंभ

सेलूतील उरुसानिमित्त मंगळवारपासून भरगच्च कार्यक्रम; सय्यद शाहबुद्दीन अवलिया साहेब उरुसाला प्रारंभ

संदल, कव्वालीसह भरगच्च कार्यक्रम; सय्यद शाहबुद्दीन अवलिया साहेब उरुसाला प्रारंभ

 

सेलू : सेलू (जि.परभणी) शहरातील कामील अवलिया हझरत सय्यद शाह शाहबुद्दीन व हझरत सय्यद बुर्हानुद्दीन यांच्या उरूसाला सोमवारपासून (पाच जून) प्रारंभ झाला आहे. दर्गाह शरीफ उरुसा निमित्त प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

पाच जून सोमवार रोजी संध्याकाळी असर नमाझ नंतर दर्गेला गुसल स्नान होईल. सहा जून मंगळवार रोजी नमाझ ए झोहर नंतर दर्गेपासून संदल काढण्यात येईल. संदल कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेलूच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवर, तहसीलदार दिनेश झांपले, सेलूचे पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे

सात जून बुधवार रोजी नमाझ ईशा नंतर दर्गेत कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. आठ जून गुरुवार रोजी नमाझ ए फज्र नंतर तक्सीम तब्रुख गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. उरूसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दर्गेचे मुत्वल्ली सय्यद कबीर सय्यद अमीर, उरुज लाला, अबरार बेग, सय्यद झुबेर, सय्यद खदिर आदींच्यावतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!