शाहबुद्दीन बुरहानुद्दीन उरुस उत्साहात; सेलूत विविध कार्यक्रम

शाहबुद्दीन बुरहानुद्दीन उरुस उत्साहात; सेलूत विविध कार्यक्रम

शाहबुद्दीन बुरहानुद्दीन उरुस उत्साहात; सेलूत विविध कार्यक्रम

परभणी : सेलू (जि.परभणी) येथील कामील अवलिया हजरत सय्यद शाह शाहबुद्दीन व हजरत सय्यद बुर्हानुद्दीन यांचा उरूस विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. सोमवारपासून (पाच जून) गुसल स्नानाने उरुसाला प्रारंभ झाला. मंगळवारी शहाबुद्दीन अवलियांच्या समाधीला कपड्याचा गलफ व फुलांची चादर चढविण्यात आली. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, रावसाहेब गाडेवाड, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,पवन आडळकर, प्रभाकर सुरवसे, रहिमखान पठाण, साईराज बोराडे, उरूजलाला, सय्यद कबीर, मिलिंद सावंत, अबरार बेग, सय्यद झुबेर, सय्यद खदिर, वाहेद अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने कव्वालीचा मुकाबला रंगला. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!