कवी विश्‍वास वसेकरांच्या ‘जगण्याचा उत्सव’ला अर्जुनवाडकर पुरस्कार; २४ जूनला वितरण

कवी विश्‍वास वसेकरांच्या ‘जगण्याचा उत्सव’ला अर्जुनवाडकर पुरस्कार; २४ जूनला वितरण

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, कवी, व समीक्षक विश्‍वास वसेकर यांच्या ‘जगण्याचा उत्सव’ या ललितलेखांच्या संग्रहाची इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या वाचनालयाच्यावतीने दरवर्षी मराठी साहित्यक्षेत्रातल्या विविध पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीपासून वसुंधरा मुकुंद अर्जुनवाडकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट ललित गद्य पुरस्काराची सुरुवात झाली आहे. प्रतिष्ठेच्या या पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी ‘जगण्याचा उत्सव’ या पुस्तकाची निवड करण्यात आली असून येत्या २४ जूनला त्याचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील या वाचनालयाला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांची परंपरा आहे.
वसेकर यांच्या या पुस्तकाला यापूर्वी नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने दिल्या जाणाऱ्या स्व. विमलताई देशमुख पुरस्कार मिळाला आहे. एकाच पुस्काला लागोपठ दोन पुरस्कार मिळणे हा वेगळा योग आहे. पुण्यातील संस्कृती प्रकाशनाच्यावतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून वसेकर यांच्या नावावर आतापर्यंत ललितगद्य या साहित्यप्रकारातली दहा पुस्तकं आहेत. वसेकर यांनी विविध साहित्यप्रकार हाताळले असून कविता, समीक्षाग्रंथ, व्यक्तिचित्रणात्मक स्वरुपाच्या लेखन प्रकारातही त्यांची अनेक पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत. विविध दैनिके आणि साप्ताहिकांमध्ये त्यांचे स्तंभलेखन सुरू आहे.


शासन आपल्या दारी : सेलूतील दोन हजार ४८४ लाभार्थ्यांना लाभ

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!