परभणी मेडिकलच्या अपीलावर गुरुवारी दिल्लीत सुनावणी; प्रवेश प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता

परभणी मेडिकलच्या अपीलावर गुरुवारी दिल्लीत सुनावणी; प्रवेश प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता

परमणी : परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसह यावर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेस हिरवा कंदील मिळावा यासाठी दाखल दुसर्‍या अपीलावर केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालयाने गुरुवारी (१५ जून) नवी दिल्लीत सूनावणी ठेवली आहे. या संदर्भात आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालयाचे अव्वर सचिव चंदनकुमार यांनी सोमवारी ( १२ जून) ई-मेल व स्पीड पोस्टद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व प्राचार्यांना कळविले आहे.
या संदर्भात अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी बुधवारी (७ जून) नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थानकडे परिपूर्ण असे दुसरे अपील दाखल केले आहे. त्यानुसार फेरपडताळणी व आवश्यक प्रक्रिया लवकरच पूर्ण होवून २०२३-२४ च्या प्रवेश प्रक्रियेला मंजूर मिळण्याच्या परभणीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थान नवी दिल्ली यांच्या समितीने काही त्रुटी काढत सन २०२३-२४ मध्ये प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास मंजूरी दिली नाही. त्यानंतर परभणीकर पुन्हा आंदोलनाच्या तयारीला लागले. तांत्रिक बाबीची पूर्तता करून अपील दाखल करण्यात आले. मात्र, हे अपील अधिष्ठाता यांनी दाखल न करता वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजू मिवोदकर यांनी दाखल केले. विलंब झाल्याचे कारण पुढे करून अपील फेटाळण्यात आले होते. पहिले अपील फेटाळल्याने अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी दुसरे अपील दाखल केले आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादरीकरण करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी खासदार संंजय जाधव, सर्व पक्षीय नेते व परभणीकरांना मोठा संघर्ष करावा लागला. घोषणा झाल्यानंतर पुढील प्रक्रिया देखील पूर्ण होण्यासाठी परभणीकरांना पुन्हा संघर्षाचीच तयारी ठेवावी लागली. परंतु; अधिष्ठाता म्हणून डॉ.शिवाजी सुक्रे यांनी १० मेरोजी पदभार स्वीकारल्यानंतर फेरपडताळणी व प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. गुरुवारी सुनावणीनंतर प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा परभणीकरांना आहे.


शासन आपल्या दारी : सेलूतील दोन हजार ४८४ लाभार्थ्यांना लाभ

राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक ; सेलूतील शिल्पा पिंपळेंचा सहभाग

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!