चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; सेलूतील मुक्तांगण आर्ट्सचा उपक्रम 

चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; सेलूतील मुक्तांगण आर्ट्सचा उपक्रम 

सेलू : जागतिक सायकल दिन व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील “मुक्तांगण आर्टस्” च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रविवारी, १८ जून रोजी पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची गोडी निर्माण व्हावी व शालेय जीवनात शक्य तिथे सायकल वापरावी हा उद्देश समोर ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.

माध्यमिक गटासाठी ‘सायकलसोबतचा क्षण आणि् पर्यावरण संवर्धन, झाडे लावूया झाडे जगवूया ‘, तर प्राथमिकगटासाठी ‘सायकलचे चित्र व विदूषकाचे चित्र’ हे विषय होते. परीक्षक म्हणून नूतन विद्यालयातील कलाशिक्षक फुलसिंग गावित यांनी काम पाहिले. डासाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे, आयर्न मॅन सुरेश नखाते, कवी‌ शरद ठाकर, फुलसिंग गावित व संचालिका भाग्यश्री पाटणकर, पांडुरंग पाटणकर आदी मान्यवरांनी विजेत्यांचे कौतुक केले.

स्पर्धेचा निकाल असा : प्राथमिक गट : श्रेयस कैलास खरात – प्रथम, शारदा विद्यालय, केशवराज सदाशिव मुळी – द्वितीय – स्वामी विवेकानंद विद्यालय, प्रेरणा बाबासाहेब काष्टे- तृतीय प्रिन्स अकॅडमी, माध्यमिक गट : क्षितिजा कैलास खजिने- प्रथम प्रिन्स अकॅडमी, मान्यता विलास तावरे – द्वितीय नूतन कन्या प्रशाला, दर्शन अनंतकुमार विश्वंभर- तृतीय नूतन इंग्लिश स्कूल


धान्याऐवजी रोख रक्कमेच्या विरोधात आंदोलन करणार;

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!