आंतरराष्ट्रीय योग दिन : शालेय विद्यार्थ्यांनी घेतले योगाभ्यासाचे धडे; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिन : शालेय विद्यार्थ्यांनी घेतले योगाभ्यासाचे धडे; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

सेलू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महसूल, शिक्षण विभाग व नूतन विद्यालयाच्या वतीने बुधवारी, २१ जून रोजी आयोजित योगाभ्यास शिबीरात शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
नूतन विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी साडेसात वाजता तहसीलदार दिनेश झांपले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, ॲड.अतुल डख, योग अभ्यासक शिवनारायण मालाणी, मुख्याध्यापक नारायण सोळंके, पी.एस.कौसडीकर, बालासाहेब हळणे, सुखानंद बेंडसुरे, सतीश नावाडे, मधुकर काष्टे आदींची उपस्थिती होती. योगशिक्षक देविदास सोन्नेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. सूत्रसंचालन गणेश माळवे यांनी केले. प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.


प्रेरणादायी : सेलू तालुक्यातील चारशे गुणवंतांचा सन्मान; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा उपक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!