योगाभ्यास शिबिराला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद; पतंजली योग समिती व क्रांती फाऊंडेशनचा पुढाकार

योगाभ्यास शिबिराला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद; पतंजली योग समिती व क्रांती फाऊंडेशनचा पुढाकार

योगाभ्यास शिबिराला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद, पतंजली योग समिती व क्रांती फाऊंडेशनचा पुढाकार

सेलू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील साईबाबा मंदिर सभामंडपात बुधवारी,२१ जून रोजी आयोजिण्यात आलेल्या योगाभ्यास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पतंजली योग समिती शाखा व क्रांती फाउंडेशनच्या समन्वयाने योगाभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी साडे सहा वाजता शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, योग समितीचे ज्ञानोबा बरसाले, क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा पौर्णिमा जोहिरे, छाया पाचलेगाकर यांची प्रमुख उपस्थिती होती., योगाभ्यास शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एन.एम.देशपांडे, डी.के.माकोडे, डाॅ.सुबोध माकोडे , राठी, कांचन बाहेती, नीता बलदेवा आदींसह नागरिक, महिलांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पाटील यांनी केले.


आंतरराष्ट्रीय योग दिन : शालेय विद्यार्थ्यांनी घेतले योगाभ्यासाचे धडे; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

प्रेरणादायी : सेलू तालुक्यातील चारशे गुणवंतांचा सन्मान; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा उपक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!