कामगारांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात; माजी आमदार लहाने यांनी केले उद्घाटन
२२०० नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ घेण्याचे आवाहन
सेलू जि.परभणी : येथील हेमंतनगरातील हिंदूहृदयसम्राट आपला दवाखाना, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि घोगरे फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शनिवारी, २४ जून रोजी सुरुवात झाली. उद्घाटक म्हणून माजी आमदार हरिभाऊ लहाने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सेलू बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, माजी नगरसेवक शेख रहीम, भाजपा उपजिल्हाप्रमुख जयसिंग शेळके, डॉ.ऋतुराज साडेगावकर, डॉ.जवळेकर, डॉ.आशिष मेहता, डॉ.गुलनाझ, तालुका प्रमुख पांडुरंग कावळे, अविनाश शेरे, संजय धापसे, बंडू देवधर, सादिक शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रविवारी, २५ जून रोजीही शिबिरात मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. या शिबीरामध्ये नोंदणीकृत कामगार व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी ५० पेक्षा जास्त चाचण्या करून संपूर्ण शारीरिक तपासणी होणार आहे. तालुक्यातील २२०० नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची तपासणी होईल. जास्तीत जास्त कामगारांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. प्रास्ताविक शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ.अनिकेत जोगदंड यांनी केले, तर सूत्रसंचालन साक्षी गिरी यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सदाशिव बर्वे, संतोष पडूळे, मोहन पौळ, विलास काळे, बालाजी कळवे, शंकर गात, राजेश राखुंडे, अभिजीत दळवे तसेच घोगरे फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन घोगरे, हिंद लॅबची सर्व टेक्निकल टीम आणि डॉक्टर्स परिश्रम घेत आहेत.
या शिबीरामध्ये नोंदणीकृत कामगार व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी ५० पेक्षा जास्त चाचण्या करून संपूर्ण शारीरिक तपासणी होणार आहे. तालुक्यातील २२०० नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची तपासणी होईल. जास्तीत जास्त कामगारांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
विविध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव; जिंतूर येथील श्री नृसिंह प्रतिष्ठानचा उपक्रम