रास्तारोको : सेलूकरांचे आज आंदोलन; सेलू-डिग्रस रस्तेकामाचा दर्जा सुमार असल्याचा आरोप

रास्तारोको : सेलूकरांचे आज आंदोलन; सेलू-डिग्रस रस्तेकामाचा दर्जा सुमार असल्याचा आरोप

सेलू : तालुक्यातील सेलू ते डिग्रस पाटी या सहा किलो मीटर अंतराच्या रस्त्याचे काम अतिशय विलंबाने, कासव गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करीत गुणवत्तापूर्ण कामाला गती मिळावी, या मागणीसाठी सेलूकरांच्या वतीने सोमवारी, २६ जून रोजी जून रोजी सेलू येथील रायगड कॉर्नरवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भात काही दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून या कामाकरीता रस्ता पूर्णतः उखडण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करतांना अक्षरशः तारेवरच्या कसरती कराव्या लागत आहेत.पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दैना होणार आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याचे काम कासव गतीने सुरू केले. पुलाचे काम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असून पूर्वीपेक्षाही पुलाची उंची कमी केली आहे. सिमेंट काँक्रिटच्या केलेल्या नाल्यावर पाणीसुध्दा टाकले जात नाही. अवघ्या पाच दिवसात नवीन केलेल्या पुलावरुन वाहतूकही सुरु करण्यात आली आहे. जमीन काळी मातीची असल्याने केलेला पूल खचत असून काँक्रेटच्या नाल्याला तडे जात आहेत. डिग्रस पाटीकडील काळ्या मातीचा वापर या रस्त्यावरील भराव कामासाठी केला जात आहे.

काहींनी या कामावर आक्षेप घेतला तेव्हा संबंधितांकडून धमकावले जात असून, “माझी वरपर्यंत पोहोच आहे. तक्रारीचा काहीच परिणाम होणार नाही.” अशा भाषेत संबंधित गुत्तेदाराकडून खडसावले जात आहे, असा सेलूकरांचा आरोप आहे. त्यामुळे या कामातील गुणवत्ता तपासावी, काम गुणवत्तापूर्ण करावे या मागणीसाठी सोमवारी सेलूकर रास्तारोको आंदोलन करणार आहेत. निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, माजी नगरसेवक रघुनाथ बागल, मनिष कदम, पत्रकार डॉ.विलास मोरे, मुश्ताक रब्बानी, विनोद तरटे, शेख दिलावर, गौस भाई लाला, इम्तियाज अलीखान, सतीश जाधव, नृसिंह हरणे, दत्तुसिंग ठाकूर, वैभव वैद्य, शेख खाजा,शेख चाँद, किशोर जोशी, जगन्नाथ कटारे, विजय नाईकनवरे, बाबुभाई, परवेज सौदागर, केशव सोळंके, शेख इसाक शेख हैदर आदींच्या सह्या आहेत.

” माझी वरपर्यंत पोहोच आहे. तक्रारीचा काहीच परिणाम होणार नाही.” अशा भाषेत संबंधित गुत्तेदाराकडून खडसावले जात आहे, असा सेलूकरांचा आरोप आहे. त्यामुळे या कामातील गुणवत्ता तपासावी, काम गुणवत्तापूर्ण करावे या मागणीसाठी सोमवारी सेलूकर रास्तारोको आंदोलन करणार आहेत.

केंद्रिय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामात लक्ष घालावे, काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभगास द्यावेत. अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीनेही करण्यात आली आहे. निमंत्रक ॲड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, सतिश काकडे, दिलीप मगर आदींनी याबाबत निवेदन मंत्री गडकरी यांना पाठवलेले आहे.


हैदराबाद मुक्तीसंग्राम : अंबाजोगाईतील स्मारक प्रेरणादायी ठरेल; सेलूतील कार्यक्रमात डॉ.सुरेश खुरसाळे यांचे प्रतिपादन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!